मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Explainer : 5G नेटवर्क कसं करेल काम, मोदींच्या हस्ते काही तासात होणार उद्घाटन

Explainer : 5G नेटवर्क कसं करेल काम, मोदींच्या हस्ते काही तासात होणार उद्घाटन

5G लाँचनंतर10-12 हजारांचे स्वस्त मोबाईल बंद होतील?वाचा तुमच्या प्रश्नांची उत्तरे

5G लाँचनंतर10-12 हजारांचे स्वस्त मोबाईल बंद होतील?वाचा तुमच्या प्रश्नांची उत्तरे

5G म्हणजे क्लिक केल्यानंतर एक मिलीसेकंदात दिसतील रिझल्ट आणि 10 ते 20 पट जास्त वेगानं डेटा डाउनलोड...

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : देशात सध्या 5Gची जोरदार चर्चा सुरू आहे. 2G,3G आणि 4G नंतर आता लवकरच 5G सेवा सुरू होणार आहे. यामुळे 4G च्या तुलनेत दसपट जास्त डाटा स्पीड युझर्सना मिळणार आहे. याचाच अर्थ 5G मुळे इंटरनेट अधिक वेगवान होणार आहे. मोठ्या फाइल्स, चित्रपट, फोटोज आदी गोष्टी युझर्स अगदी काही सेकंदात अपलोड किंवा डाउनलोड करू शकणार आहेत. एकूणच 5G मुळे देशात एक नवीन डिजिटल पर्व सुरू होणार आहे. या नेटवर्कमुळे अनेक गोष्टी आणखी सोप्या होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर 5G नेटवर्क म्हणजे काय, ते कसं काम करेल आदी प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. `प्रभात खबर`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

देशात सध्या 5G नेटवर्कविषयी जोरदार चर्चा आहे. 5G स्पेक्ट्रमची लिलाव प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेतून रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया, भारती एअरटेल आणि अदानी डाटा नेटवर्क्सने आपला हिस्सा खरेदी केला आहे. देशात या वर्षाच्या अखेरीपर्यंत सर्व मोठ्या टेलिकॉम कंपन्या अधिकृतपणे 5G सेवा सुरू करण्याची शक्यता आहे. 5G नेटवर्कमुळे इंटरनेट अधिक वेगवान होणार असून, त्याचा फायदा साहजिकच युझर्सना होणार आहे. 5G मोबाइल सर्व्हिस सुरू झाल्यानंतर मोबाइल टेलिफोनी जग पूर्णपणे बदलून जाणार आहे. अंदाजानुसार, 5Gचा स्पीड हा 4G च्या तुलनेत दसपट जास्त असेल. ही सेवा सुरू झाल्यानंतर ऑटोमेशनचं एक नवं पर्व सुरू होईल.

5G मोबाइल सर्व्हिस सुरू झाल्यानंतर मोबाइल टेलिफोनी जगात मोठा बदल

आतापर्यंत ज्या गोष्टी केवळ शहरांपुरत्याच मर्यादित होत्या, त्या आता ग्रामीण भागातही पोहोचतील. यात ई-मेडिसीनसारख्या सुविधेचाही समावेश आहे. शिक्षण आणि कृषी क्षेत्राला या नेटवर्कमुळे मोठा फायदा होईल. 5G नेटवर्क सेवा लॉंच झाल्यानंतर देशातल्या डिजिटल क्रांतीला एक नवीन परिमाण प्राप्त होईल. रोबोटिक्स तंत्राचा अजून विकास होईल. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. तसंच ई-गर्व्हनन्सचा विस्तार होईल. कोरोनानंतर आपलं इंटरनेटवरचं अवलंबित्व वाढलं आहे. ही स्थिती बघता 5G प्रत्येक व्यक्तीचं जीवन अधिक चांगलं आणि सोपं बनवण्यात मदत करेल. 5G टेक्नॉलॉजीमुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हेल्थकेअर, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी, क्लाउड गेमिंगसाठी नवे मार्ग खुले होतील. ड्रायव्हरलेस कारचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. 5G नेटवर्कवर यंत्रं आपापसात समन्वय साधतील.

5G: उरले फक्त काही तास! पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार 5G चं उद्घाटन

5G नेटवर्क अनेक अर्थांनी खास असेल. 5Gमध्ये वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. 5G चा अर्थ 5th Generation Network असा आहे. ही एक वायरलेस कनेक्टिव्हिटी आहे. यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम अर्थात रेडिओ लहरींचा वापर केला गेला आहे. हे मोबाइल नेटवर्कमधलं एक नवीन तंत्रज्ञान आहे. मागच्या सर्व नेटवर्क जनरेशन्सच्या तुलनेत वायरलेस डाटा क्षेत्रात 5G नेटवर्क खूप मोठी भूमिका बजावेल. 5G किंवा फिफ्थ जनरेशन हा लॉंग टर्म इव्होल्युशनमधला (LTE) एक टप्पा आहे. 5G नेटवर्कमध्ये युझर्सना फास्ट इंटरनेट स्पीड मिळेल आणि नेटवर्कचा दर्जादेखील उत्तम असेल. 5G प्रामुख्याने तीन बँड्समध्ये काम करतं. यात लो बॅंड, मिडल आणि हाय फ्रिक्वेन्सी बॅंड स्पेक्ट्रमचा समावेश आहे. नुकताच या तिन्ही स्पेक्ट्रमचा लिलाव पूर्ण झाला आहे. या तिन्ही बॅंडची कामं आणि फायदे निरनिराळे आहेत. लो फ्रिक्वेन्सीमध्ये 600,700,800,900, 1800, 2100 आणि 2300 मेगाहर्ट्झ येतात. ही फ्रिक्वेन्सी जवळपास 4G सारखीच आहे. मीडियम फ्रिक्वेन्सीमध्ये 3000 मेगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी येते. हाय फ्रिक्वेन्सीमध्ये 26 गीगाहर्ट्झ फ्रिक्वेन्सी येते.

5G म्हणजे क्लिक केल्यानंतर एक मिलीसेकंदात दिसतील रिझल्ट

5G नेटवर्कमुळे चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. तसंच अ‍ॅडव्हान्स अ‍ॅन्टेना टेक्नॉलॉजीद्वारे नवीन रेडिओ फ्रिक्वेन्सीवर डेटा ट्रान्सफर झाल्यानं डेटा ट्रान्समिशन स्पीड लक्षणीय वाढेल आणि नेटवर्क लेटन्सी अर्थात विलंब कमी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता नेटवर्क लेटन्सी म्हणजे काय ते जाणून घेऊ या. जेव्हा तुम्ही मोबाइलवर इंटरनेटच्या मदतीनं काही सर्च करता तो फोन आणि टार्गेट सर्व्हर दरम्यानचा वेळ म्हणजे लेटन्सी समजला जातो. 4G नेटवर्कमध्ये ही लेटन्सी 40ms (40 मिलीसेकंद) आहे. 5G मध्ये हा कालावधी 1ms असण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक मिलीसेकंदात त्याचे रिझल्ट दिसतील. 5G नेटवर्कमध्ये नेटवर्क मॅनेजमेंटविषयी खास फीचर्स असतील, जेणेकरून नेटवर्क स्लाइसिंगद्वारे मोबाइल ऑपरेटर एकाच 5G नेटवर्कमध्ये भिन्न आभासी नेटवर्क तयार करू शकतील. यामुळे सातत्य आणि वेग कायम राहील.

5G टेक्नॉलॉजीत इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजेच रेडिओ लहरींचा वापर केला आहे. 5G तंत्राची माहिती रेडिओ लहरी समजून घेतल्यास अधिक चांगल्या पद्धतीनं मिळू शकते. वैज्ञानिक व्याख्येनुसार, एका निश्चित वेळेच्या अंतराने रेडिओ तरंगांची किती वेळा पुनरावृत्ती होते तिला तरंग वारंवारिता म्हणतात. ही वारंवारिता हर्ट्झमध्ये मोजली जाते. रेडिओ तरंग स्वतःची पुनरावृत्ती होण्यासाठी जितका वेळ घेतात त्याला तिची तरंगलांबी म्हणतात. रेडिओ लहरींची वारंवारिता वाढली की त्यांची वेव्हलेंग्थ कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत जेव्हा वारंवारिता जास्त असते किंवा तरंगलांबी कमी असते तेव्हा वेव्ह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगानं पोहोचतात. परंतु, जास्त लांब अंतराचा प्रवास करू शकत नाहीत. याचं कारण म्हणजे लहान तरंग लांबीमुळे रेडिओ लहरी वेगवेगळ्या पृष्ठभागावर प्रवेश करू शकत नाहीत. याउलट वारंवारिता कमी आणि तरंगलांबी जास्त असताना रेडिओ लहरी कमी वेगानंदेखील लांब अंतरापर्यंत जाऊ शकतात.

10 ते 20 पट जास्त वेगानं डेटा डाउनलोड

5G टेक्नॉजीच्या नेटवर्क स्पीडबद्दल अनेक दावे केले जात आहेत. त्यात 5G वर इंटरनेट स्पीड 4G पेक्षा 30 ते 40 पट जास्त असेल असं सांगितलं जात आहे. येता काळ 5G चा आहे. 4G नेटवर्कच्या तुलनेत 5G जास्त वेगवान असेल. 4G नेटवर्कवर सरासरी इंटरनेट स्पीड 45 Mbps असतो; पण 5G नेटवर्कवर हा स्पीड वाढून 1000 Mbps पर्यंत पोहोचेल. यामुळे इंटरनेटची दुनिया आमूलाग्र बदलून जाईल. 4G च्या तुलनेत या नेटवर्कवरून 10 ते 20 पट जास्त वेगानं डेटा डाउनलोड होईल. 4G नेटवर्कवर एक चित्रपट डाउनलोड करण्यासाठी सहा मिनिटं लागतात; पण 5G नेटवर्कवर हे काम केवळ 20 सेकंदांत पूर्ण होईल.

मोबाईलबाबत सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार, तुम्हाला कसा होणार फायदा? वाचा

भारतात रिलायन्स जिओ आल्यानंतर इंटरनेट बहुतांश जणांच्या आवाक्यात आलं. सध्या 80 कोटी व्यक्ती ब्रॉडबॅंडचा वापर करतात. 5G इंटरनेट प्लॅनच्या किमतीबाबत सध्या कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. 4G प्लॅनच्या किमतीच्या तुलनेत याचे प्लॅन निश्चितच थोडे महाग असतील. मार्केट तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 5G स्पेक्ट्रम लिलावासाठी टेलिकॉम कंपन्यांनी पाण्यासारखा पैसा ओतला आहे. त्यामुळे याची भरपाई ग्राहकांकडून केली जाणार हे स्पष्ट आहे. बाजारपेठेतली स्पर्धा लक्षात घेता, 4G सारखीच रणनीती स्वीकारून कंपन्या 5G लॉंचवेळी सुरुवातीला प्लॅनची किंमत ठेवतील आणि नंतर वाढवतील, असं होऊ शकतं.

First published:

Tags: 5G, Mobile Phone, Narendra modi