Home /News /money /

शेअर बाजारातील घसरणीदरम्यान म्युच्युअल फंड्समधील गुंतवणूक कशी फायदेशीर ठरते, तज्ज्ञांकडून समजून घ्या

शेअर बाजारातील घसरणीदरम्यान म्युच्युअल फंड्समधील गुंतवणूक कशी फायदेशीर ठरते, तज्ज्ञांकडून समजून घ्या

    मुंबई, 2 मे : ग्लोबल मार्केटसह भारतीय शेअर बाजारातही (Share Market) सध्या घसरण सुरू आहे. बाजारातील मंदीच्या वेळी लोक अनेकदा पैसे काढू लागतात किंवा गुंतवणूक थांबवतात. लोक म्युच्युअल फंडाच्या SIP मध्ये (Mutual Funs SIP) देखील गुंतवणूक करणे  बंद करतात. मात्र ही चुकीची गुंतवणूक पॉलिसी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बाजारात वाढ असो वा घसरण या दोन्ही प्रसंगी SIP सर्वात प्रभावी ठरते. जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला युनिट्स मिळतात आणि बाजारातील मंदीच्या काळात तुम्हाला जास्त युनिट्स मिळतात. याचा अर्थ जेव्हा बाजार वर जाईल तेव्हा तुम्हाला सामान्यपेक्षा जास्त परतावा मिळेल. ही चूक करू नका बाजारातील तज्ज्ञांच्या मते, काही लोक बाजारातील मंदीच्या वेळी एसआयपी बंद करून आणि जुन्या युनिट्सची विक्री करून चूक करतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुम्ही एखादी वस्तू जास्त किंमतीला विकत घेत आहात आणि कमी किमतीत विकत आहात. जेव्हा एसआयपीमध्ये गुंतवणुकीचा विचार येतो, तेव्हा ते चक्र कितीही काळ टिकले तरीही घसरणीचे संपूर्ण चक्र पाहा. अशा प्रकारे तुम्ही दीर्घकाळात गुंतवणुकीवर जास्त परतावा मिळवू शकता. LIC IPO GMP: एलआयसी IPO च्या ग्रे मार्केट प्राईजमध्ये झपाट्याने वाढ, गुंतवणूक करावी की नाही? तज्ज्ञ काय सांगतात? गुंतवणूक करावी की नाही? बाजाराच्या ट्रेंडनुसार, बाजारात घसरणीनंतर तेजी येते. त्यामुळे बाजारातील चढ-उतार समजून घ्या आणि गुंतवणूक करा. मंदीच्या काळात बाजार समजून घेणे कठीण असते, परंतु स्टॉक घेण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ असते. बाजार जितका अधिक घसरेल तितका SIP साठी चांगला असेल. तुम्ही कमी पैशात जास्त युनिट्स खरेदी करू शकता. लोन, बँक चार्जेस, गुंतवणूक संबंधित चार नियमांत बदल; नव्या नियमांचा तुमच्यावर कसा परिणाम होणार समजून घ्या जसजसे उत्पन्न वाढेल तसतशी SIP मधील गुंतवणूक वाढवली पाहिजे. यासाठी तुम्ही टॉप अपचा पर्याय निवडू शकता. संपत्ती निर्माण करण्यासाठी एसआयपी हे नेहमीच महत्त्वाचे साधन राहिले आहे. गुंतवणूकदारांच्या बदलत्या गरजांनुसार इंडस्ट्रीनेही SIP मध्ये बदल केले आहेत. त्यामुळे सध्याच्या वातावरणात, एसआयपीमधून बाहेर पडून तुमची गुंतवणूक वाया घालवू नका. उलट गुंतवणूक वाढवा. कालांतराने तुम्हाला कळेल की ही सर्वात प्रभावी गुंतवणूक धोरण आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Mutual Funds

    पुढील बातम्या