मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Car Loan : कार लोन घेताना काय खबरदारी घ्याल? कालवधी किती निवडाल?

Car Loan : कार लोन घेताना काय खबरदारी घ्याल? कालवधी किती निवडाल?

कमी कार्यकाळ म्हणजे जास्त EMI भरणे, याचा अर्थ व्याजही कमी जाते. त्यामुळे, कमी कालावधीमुळे तुम्हाला तुमचे कर्ज लवकर फेडता येईल.

कमी कार्यकाळ म्हणजे जास्त EMI भरणे, याचा अर्थ व्याजही कमी जाते. त्यामुळे, कमी कालावधीमुळे तुम्हाला तुमचे कर्ज लवकर फेडता येईल.

कमी कार्यकाळ म्हणजे जास्त EMI भरणे, याचा अर्थ व्याजही कमी जाते. त्यामुळे, कमी कालावधीमुळे तुम्हाला तुमचे कर्ज लवकर फेडता येईल.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 17 नोव्हेंबर : घर किंवा कार खरेदी (Car Buying tips) करताना आपण खुप आनंदात असते. त्यातही मोठी आर्थिक उलाढाल आपण यावेळी करत असतो. अशा वेळी आनंदात असताना आपण सर्व निर्णय भावनिक होऊन नाही व्यवहारिक घेतल पाहिजेत. घर किंवा कार घेताना कर्ज (Car Laon) घेतो त्यावेळी कोणता EMI पर्याय निवडावा, कोणता कालावधी निवडावा याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे, अनेक बँका कमाल 7 ते 8 वर्षांच्या कालावधीसाठी कार कर्ज पुरवतात.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कार कर्जाची निवड करताना, बँका जरी दीर्घ कालावधीची ऑफर (Loan long term offer) देत असतील तरी, कर्जदारांनी EMI लक्षात ठेवून लहान मुदतीची निवड करावी. कार्यकाळ जितका लहान असेल तितका EMI जास्त असतो. मात्र कमी कार्यकाळ म्हणजे जास्त EMI भरणे, याचा अर्थ व्याजही कमी जाते. त्यामुळे, कमी कालावधीमुळे तुम्हाला तुमचे कर्ज लवकर फेडता येईल.

दीर्घ कालावधी म्हणजे अधिक व्याज

उदाहरणार्थ, जर तुम्ही 8.5 टक्के व्याजदरासह 10 लाख रुपयांचे कार कर्ज घेतले तर 4 वर्षांच्या कार कर्जासाठी EMI सुमारे 24,000 रुपये असेल. तर 8 वर्षांच्या कार कर्जासाठी तुमचा EMI सुमारे 14,000 असेल, तर चार वर्षासाठी EMI जवळपास निम्मा असेल. 4 वर्षांच्या कार कर्जावर दिलेले व्याज सुमारे 1.83 लाख रुपये लागेल, तर 8 वर्षांच्या कार कर्जावरील व्याज सुमारे 3.81 लाख रुपये असेल, जे 4 वर्षांत भरलेल्या व्याजापेक्षा दुप्पट आहे.

शेतकऱ्यांना 10व्या हप्त्यात 4000 रुपयांसह मिळणार 3 मोठे फायदे, वाचा सविस्तर

साधारणपणे लोक दीर्घ कालावधीसाठी निवड करतात जेणेकरून त्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळेल. मात्र यात जास्त व्याज खर्च आणि अतिरिक्त आर्थिक भार देखील असतो. त्यामुळे जर कार-कर्ज कालावधी जितका जास्त तुम्ही निवडता तितका जास्त व्याज खर्च तुम्हाला करावा लागेल. त्यामुळे जास्त व्याजदर टाळण्यासाठी कर्जदाराने दीर्घ कालावधीसाठी कर्ज घेणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

वयाच्या कोणत्या वर्षी LIC ची पॉलिसी घेणे फायदेशीर? मुलांचं भविष्य असं करा सुरक्षित

आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की कारचा सरासरी वापर कालावधी साधारणतः 5-6 वर्षे असतो. त्यानंतर ती विकली जाते किंवा जुन्या डीलरला दिली जाते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की दीर्घ मुदतीच्या कर्जाचा कालावधी त्रासदायक ठरतो कारण कार मालकाला कार विकल्यानंतरही थकीत कर्जाची परतफेड करणे सुरू ठेवावे लागते. तसेच, कार निर्माते सहसा 8 वर्षांची वॉरंटी देत ​​नाहीत, त्यामुळे कार खरेदी केल्यानंतर पहिल्या काही वर्षानंतर जास्त मेंटेनन्स आकारला जाईल. त्यामुळे एका बाजूला EMI दुसरीकडे मेंटेनन्सचा खर्च तुमच्यासाठी मोठा आर्थिक भार बनू शकतो.

तज्ञांचे म्हणणे आहे की बहुतेक लोक कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहतात, तरीही कार खरेदी ही एक डेड इन्वेस्टमेंट आहे हे कर्जदारांनी लक्षात ठेवावे. त्यामुळे कार लोन निवडताना काळजी घ्या. व्याज दर तसेच प्रोसेसिंग फी, प्रीपेमेंट फी आणि कार कर्जांसंबंधी इतर शुल्क तपासून घ्या.

First published:

Tags: Car, Loan