मराठी बातम्या /बातम्या /मनी /सेविंग अकाउंटवर किती पैसे जमा करु शकता? एका क्लिकवर जाणून घ्या टॅक्सचे नियम

सेविंग अकाउंटवर किती पैसे जमा करु शकता? एका क्लिकवर जाणून घ्या टॅक्सचे नियम

सेविंग अकाउंट

सेविंग अकाउंट

तुमच्या सेविंग अकाउंटवरुन मिळणारे व्याज तुमच्या इतर सर्व स्रोतांच्या उत्पन्नात जोडले जाते आणि त्यानंतर तुमच्या एकूण उत्पन्नावर संबंधित टॅक्स ब्रॅकेटनुसार टॅक्स आकारला जातो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 26 जानेवारी: सेविंग अकाउंट हे तुमची बचत, खर्च आणि गुंतवणूक मॅनेजमेंट करण्यासाठी बँकेतील जमा खाते असते. हे खाते देशातील जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे आहे. परंतु बचत खात्यातून मिळणाऱ्या व्याजावरही कर आकारला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? जर तुमचे सेविंग अकाउंटवरील व्याज एका आर्थिक वर्षात रु. 10,000 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कर भरावा लागतो. बचत खात्यातून 10,000 रुपयांपर्यंतच्या व्याजावर कोणते टॅक्स आकारले जात नाही. ही वजावट आयकर कायद्याच्या कलम 80TTA अंतर्गत केली जाऊ शकते आणि हे एक व्यक्ती आणि HUF (हिंदू अविभक्त कुटुंब) साठी उपलब्ध आहे.

सेविंग अकाउंटवर पैसे जमा करण्याची मर्यादा किती?

भारतात सेविंग अकाउंट उघडण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. म्हणजेच, एखादी व्यक्ती कितीही बचत खाती उघडू शकते. विशेष म्हणजे भारतात बचत खात्यात पैसे जमा करण्यासाठी कोणतीही लिमिट नाही. म्हणजे बचत खात्यात तुम्हाला हवे तेवढे पैसे जमा करता येतात. झिरो बँलेन्स अकाउंट वगळता तुम्ही इतर सर्व सेविंग बँक अकाउंटमध्ये मिनिमम बँलेन्स ठेवणे अनिवार्य असते. बँकेने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा कमी पैसे खात्यात ठेवल्याबद्दल बँक शुल्क आकारते.

फिरायला जायचा प्लान करताय? IRCTC चा काश्मीर प्लान अवश्य पाहा, मिळतील 'या' सुविधा!

व्याजावर असे लावले जाते टॅक्स

तुमच्या सेविंग अकाउंटवरुन मिळणारे व्याज तुमच्या इतर सर्व स्रोतांच्या उत्पन्नात जोडले जाते आणि त्यानंतर तुमच्या एकूण उत्पन्नावर संबंधित टॅक्स ब्रॅकेटनुसार टॅक्स आकारला जातो. त्या कालावधीत तुमच्या बँक खात्यातील पैशांच्या आधारावर प्रत्येक एका फायनेंशियल ईयरमध्ये वेगवेगळे असते. मासिक शुल्क वाचवण्यासाठी काही बचत खात्यांमध्ये कमीत कमी बॅलेन्स ठेवण्याची गरज पडते. तर काहींना यामधून सूट मिळते.

बचत खात्यांवर कोणती बँक किती व्याज देते? एका क्लिकवर घ्या जाणून

कलम 80TTA म्हणजे काय?

इन्कम टॅक्स कायद्यातील कलम 80TTA नुसार 'बचत खात्यातील ठेवींवरील व्याजाच्या संदर्भात वजावट' आहे. ही वजावट त्या व्यक्ती आणि HUF (हिंदू अविभक्त कुटुंब) यांना लागू आहे ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा कमी आहे. कलम 80TTA फक्त बचत खात्यांच्या बाबतीत लागू केले जाऊ शकते. टर्म डिपॉजिट्स, फिक्स्ड डिपॉजिट्स किंवा आवर्ती डिपॉजिट्स या अंतर्गत येत नाहीत.

ही कलम तुम्हाला पोस्ट ऑफिस, बँक किंवा को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये जमा केलेल्या बचत खात्यांवर कपातीचा दावा करण्याची परवानगी देतो. यापैकी कोणत्याही स्रोतातून मिळालेल्या 10,000 रुपयांपेक्षा जास्त व्याजावर कर आकारला जाईल.

कलम 80 TTB काय आहे

कलम 80TTB बचत खाती आणि मुदत ठेवींवरील व्याजासाठी ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी 50,000 रुपयांपर्यंतची वजावट प्रदान करते. हे सेविंग बँकअकाउंट, फिक्स्ड डिपॉजिट्स, आवर्ती डिपॉजिट्स इत्यादी सर्व प्रकारच्या ठेवींवर लागू केले जाऊ शकते.

ज्येष्ठ नागरिकांव्यतिरिक्त सामान्य व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंब कलम 80TTB अंतर्गत कर कपातीचा लाभ घेऊ शकत नाहीत. अनिवासी भारतीय देखील 80TTB कपातीसाठी पात्र नाहीत.

First published: