Home /News /money /

सोन्यावरील टॅक्स वाढल्यामुळे दागिन्यांच्या किंमतीवर काय आणि कसा परिणाम होईल? वाचा सविस्तर

सोन्यावरील टॅक्स वाढल्यामुळे दागिन्यांच्या किंमतीवर काय आणि कसा परिणाम होईल? वाचा सविस्तर

प्रतिकात्मक छायाचित्र

प्रतिकात्मक छायाचित्र

भारतीय रुपयाची किंमत ही डॉलरच्या तुलनेत घसरत चालली आहे. ती सावरण्यासाठी सरकारने सोन्यावरील आयात कर 10.75 टक्क्यांवरून 15 टक्के (New Gold Import Duty) केला आहे.

मुंबई 07 जुलै : भारतीय लोक आणि त्यांचं सोन्याच्या दागिन्यांबाबतचं असलेलं प्रेम हे सर्वांनाच माहिती आहे. केवळ दागिन्यांची आवड म्हणून नाही, तर एक गुंतवणूक (Gold Investment) म्हणूनही लोक सोनं खरेदी करून ठेवतात. अडी-अडचणीच्या वेळी घरातील सोन्याचे दागिने तारण ठेऊन, किंवा मोडून खर्च भागवता येतो. सोन्याचे भाव (Gold Rates) अगदी क्वचितच खाली घसरतात, तेही अगदी कमी प्रमाणात. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिलं जातं. मात्र, सध्या सोन्याचे दागिने खरेदी करायचा विचार करत असाल, तर तुम्हाला जादा पैसे द्यावे लागणार आहेत. कारण केंद्र सरकारने सोन्याच्या आयात करात (Gold Import Duty) वाढ केली आहे. भारतीय रुपयाची किंमत ही डॉलरच्या तुलनेत घसरत चालली आहे. ती सावरण्यासाठी सरकारने सोन्यावरील आयात कर 10.75 टक्क्यांवरून 15 टक्के (New Gold Import Duty) केला आहे. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोनं आयात करणारा देश आहे. सोन्याची आयात करण्यासाठी सरकारी तिजोरीतील परकीय चलनाचा वापर करावा लागतो. आयात वाढल्यामुळे करंट अकाउंट डेफिसिटवर ताण वाढतो. हाच ताण कमी करण्यासाठी सरकारने आयात कर वाढवला आहे. ज्यामुळे आयात कमी होईल, आणि पर्यायाने परकीय चलनाचा वापर कमी होईल. मात्र, याचा तोटा (Gold Import duty hike) सामान्य नागरिकांना होणार आहे. भारतात आयात केलेल्या सोन्याचा मोठा भाग हा दागिने बनवण्यासाठी वापरला जातो. आयात कर वाढल्यामुळे आता सोन्याच्या दागिन्यांच्या किंमतीही (Gold jewellery price) वाढणार आहेत. TV9 हिंदीने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. Gold Price Today: सोनं खरेदीची चांगली संधी, सोन्याच्या दरात आज मोठी घसरण, चांदीही स्वस्त सोन्यावर एकूण किती कर सोन्याचा एकूण आयात कर हा खरं तर 15.75 टक्के झाला आहे. यात 12.50 टक्के बेसिक इम्पोर्ट ड्युटी, 2.5 टक्के अ‍ॅग्री सेस आणि 0.75 टक्के सोशल वेलफेअर चार्ज याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त सोन्यावर 3 टक्के जीएसटी (GST on Gold) देखील लागू होतो. हिऱ्यांच्याही वाढल्या किमती सोन्यासोबतच हिऱ्यांवरील कस्टम ड्युटीदेखील (Diamond Custom duty) वाढवली आहे. सोबतच कट आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांवरील जीएसटी 0.25 टक्क्यांवरून 1.5 टक्के करण्यात आला आहे. 18 जुलै 22 पासून हा नियम लागू होईल. यामुळे हिऱ्यांच्या किंमती (Diamond Price) वाढतील. परिणामी, हिरेजडित सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती आणखी वाढणार आहेत. Gold Price Today: सोन्याच्या दरात आज वाढ, चांदीही महागली; एक तोळे दागिन्यांसाठी किती पैसे लागतील? असा लागतो सोन्याच्या दागिन्यांचा हिशेब सोन्याच्या दागिन्यांचा भाव ठरवण्यासाठी ज्वेलर्स एक फिक्स फॉर्म्युला (Gold jewellery price) वापरतात. यामध्ये शुद्धता आणि निर्धारित वजन यानुसार हिशेब केला जातो. सोबतच जीएसटी आणि मेकिंग चार्जेसही जोडण्यात येतात. भाव ठरवण्यासाठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत घेतली जाते. यात 22 कॅरेट किंवा 18 कॅरेट सोन्याचा दर घेतला जातो. या दराला सोन्याच्या ग्रॅममधील वजनाशी गुणले जाते. त्यानंतर यात मेकिंग चार्जेस आणि 3 टक्के जीएसटी वाढवला जातो. पुढे 35 रुपये हॉलमार्किंग चार्ज लावला जातो. अशाप्रकारे एका दागिन्याची अंतिम किंमत ठरते. सोन्याच्या दरात किती वाढ आयात कर वाढल्यामुळे 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम एक हजार रुपयांपर्यंत वाढला आहे. सध्या सोन्याचा दर सुमारे 53,000 रुपये प्रतितोळा आहे. वाढलेला आयात कर लागू झाल्यानंतर या किंमती आणखी वाढणार आहेत. यामुळे आता सामान्यांना सोन्याचे दागिने घेणं आणखी महागात पडणार आहे.
First published:

Tags: Gold, Gold price

पुढील बातम्या