Home /News /money /

सावधान! तुमचे आधार कार्ड असू शकते बनावट, वाचा कसे घ्याल तपासून

सावधान! तुमचे आधार कार्ड असू शकते बनावट, वाचा कसे घ्याल तपासून

कोरोना काळात फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अशावेळी हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्हाला मिळालेला आधार कार्ड (Aadhaar card) क्रमांक बनावट तर नाही ना.

    नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : सध्याच्या काळात भारतीयांसाठी आधार कार्ड (Aadhaar card)  हे एक अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र आहे. एखादे सिम कार्ड खरेदी करण्यापासून खाजगी व सरकारी क्षेत्रापर्यंत सर्वत्र आधारची गरज भासते. घरासाठी आवश्यक कामांसाठी, बँकिंग संबधित कामांसाठी आधार क्रमांक द्यावा लागतो. अशावेळी जर असे लक्षात आले की तुमच्याकडे असणारे आधार कार्ड बनावट  (Fake Aadhaar card)  आहे, तर ते त्रासदायक ठरू शकते. शावेळी हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्हाला मिळालेला आधार कार्ड (Aadhaar card) क्रमांक बनावट तर नाही ना. या परिस्थितीत आधार कार्ड बनावट आहे की खरे हे ओळखता येणे गरजेचे आहे. असे तपासा आधार कार्ड खरे आहे की बनावट -सर्वात आधी https://resident.uidai.gov.in/aadhaarverification या आधारच्या अधिकृत वेबसाइटवर जा -याठिकाणी आधार व्हेरिफिकेशन पेज ओपन होईल, तिथे एक टेक्स्टबॉक्स दिसेल. तिथे तुम्हाला आधार कार्ड क्रमांक समाविष्ट करावा लागेल. (हे वाचा-Jio IPL Tariff Plans: आयपीएलसाठी जिओचे खास प्लॅन्स, मोबाइलवर कुठेही पाहा सामने) -आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर त्याठिकाणी दिसणारा कॅप्चा कोड टाकावा लागेल -त्यानंतर व्हेरिफाय बटणवर क्लिक करा. जर तुमचा आधार क्रमांक योग्य आहे तर एक नवीन पेज ओपन होईल. ज्यामध्ये तुम्हाला एक मेसेज मिळेल ज्यामध्ये तुमचा आधार क्रमांक दिलेला असेल. -याबरोबर काही अन्य माहिती दिली असेल. जर तुमचा आधार क्रमांक चुकीचा किंवा बनावट असेल तर Invalid आधार क्रमांक असे दाखवण्यात येईल. (हे वाचा-SBI ATM मधून 10000 रु. पेक्षा अधिक रक्कम काढण्याचा नियम 18 सप्टेंबरपासून बदलणार) आधार संबंधित ऑनलाइन माहिती प्राप्त करण्यासाठी रजिस्टर्ड मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमचा ईमेल आणि मोबाइल नंबर सत्यापित करू शकता जो नोंदणीच्या वेळी किंवा नवीन आधार तपशील देताना दिला असेल. जर तुम्हाला आधारशी संबंधित तक्रार नोंदवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला टोल फ्री नंबर 1947 वर कॉल करावा लागेल
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Aadhar card

    पुढील बातम्या