मराठी बातम्या /बातम्या /मनी /

घरबसल्या असं बनवा मतदान ओळखपत्र, ही कागदपत्र असणं आवश्यक

घरबसल्या असं बनवा मतदान ओळखपत्र, ही कागदपत्र असणं आवश्यक

तुमच्या मतदान ओळख पत्रावर एक युनिक सीरियल नंबर, कार्डधारकाचे नाव, जेंडर, जन्मतारीख, वडिलांचे नाव, फोटो, राज्याचा एक विशेष होलोग्राम आणि तुमचा सविस्तर पत्ता दिलेला असतो.

तुमच्या मतदान ओळख पत्रावर एक युनिक सीरियल नंबर, कार्डधारकाचे नाव, जेंडर, जन्मतारीख, वडिलांचे नाव, फोटो, राज्याचा एक विशेष होलोग्राम आणि तुमचा सविस्तर पत्ता दिलेला असतो.

तुमच्या मतदान ओळख पत्रावर एक युनिक सीरियल नंबर, कार्डधारकाचे नाव, जेंडर, जन्मतारीख, वडिलांचे नाव, फोटो, राज्याचा एक विशेष होलोग्राम आणि तुमचा सविस्तर पत्ता दिलेला असतो.

  • Published by:  Janhavi Bhatkar
नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : आधार कार्ड (Aadhar Card) प्रमाणेच मतदान ओळखपत्र (Voter ID Card) हे एक आवश्यक दस्तावेज आहे. तुम्हाला जर वोटर आयडी बनवायचे असेल तर ते तुम्ही घरबसल्या देखील बनवू शकता. तुम्हाला कुठे जाण्याचीही गरज नाही. तुम्हाला वोटर आयडी बनवून मिळेपर्यंत साधारण महिनाभराचा कालावधी जाऊ शकतो. जाणून घ्या याकरता कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, आणि कोणत्या वेबसाइटवरून हे काम पूर्ण करता येईल. मतदान करण्यासाठी या कागदपत्राची आवश्यकता असते. तुमच्या मतदान ओळख पत्रावर एक युनिक सीरियल नंबर, कार्डधारकाचे नाव, जेंडर, जन्मतारीख, वडिलांचे नाव, फोटो, राज्याचा एक विशेष होलोग्राम आणि तुमचा सविस्तर पत्ता दिलेला असतो. भारतीय नागरिक ज्याचे वय कमीत कमी 18 वर्षे आहे तो मतदान ओळखपत्र बनवू शकतो. यामध्ये तुमच्या कायमचा पत्ता दिलेला असतो. मतदान ओळखपत्र बनवण्याकरता ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता. कसा कराल ऑनलाइन अर्ज? -भारतीय निवडणूक आयोगाच्या https://eci.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा -त्याठिकाणी मतदाता सेवा पोर्टलवर https://www.nvsp.in/ क्लिक करा (हे वाचा-Google सर्चमध्ये PF ऑफिसचा दिलेला हा नंबर डायल करताय तर सावधान! होऊ शकते फसवणूक) -त्याठिकाणी नवीन नोंदणीच्या ऑनलाइन अर्जावर क्लिक करा -मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडीने रजिस्ट्रेशन करून फॉर्मच्या पर्यायावर क्लिक करा -त्यानंतर फॉर्म 6 सिलेक्ट करून तो काळजीपूर्वक भरा -याठिकाणी तुम्हाला नाव, जन्मतारीख, पत्ता ही माहिती द्यावी लागेल -त्यानंतर तुम्हाला पत्ता आणि जन्म दाखला ही आवश्यक कादजपत्रं जोडावी लागतील (हे वाचा-डबल दणका! झपाट्याने वाढणाऱ्या किंमतीच्या काळात गोदामात सडला 32 हजार टन कांदा) -सर्व कागदपत्र जोडून झाल्यावर सबमिटवर क्लिक करा कोणती कागदपत्र आवश्यक? 1. एक पासपोर्ट साइझ फोटो 2.ओळखपत्रासाठी तुम्ही जन्म दाखला, पासपोर्ट, ड्राइव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड किंवा हायस्कुल मार्कशीट अपलोड करू शकता. 3. पत्त्याच्या दाखल्यासाठी रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्राइव्हिंग लायसन्स, फोन किंवा वीज-पाणी बिल देऊ शकता. महिनाभरात मिळेल मतदान ओळखपत्र ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या मेल आयडीवर विभागाकडून एक लिंक पाठवली जाईल. ज्या माध्यमातून तुम्ही वोटर आयडीचे स्टेटस चेक करू शकता. साधारण महिनाभराच्या कालावधीमध्ये तुमचे मतदान ओळखपत्र तुमच्या घरी पोहोचेल.
First published:

पुढील बातम्या