मुंबई : गाडी वापरत असाल तर ही बातमी वाचायलाच हवी. तुम्हाला माहित आहे का की कारवर अडीअडचणीच्या काळात कर्ज घेता येऊ शकतं? तुमची गाडी तुमच्या वाईट काळात पैशांची व्यवस्थाही करू शकते. जर तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली आणि तुमच्याकडे कोणताही दुसरा मार्ग नसेल, तर तुमची गाडी तुमचा मोठा आधार बनू शकते.
कारच्या बदल्यात बँका, बिगर बँकिंगसारख्या वित्तीय संस्थांकडूनही तुम्ही कर्ज घेऊ शकता. या प्रकारचे कर्ज हे सुरक्षित कर्जाच्या श्रेणीत मोडते. कारविरोधात कर्ज देण्याची प्रक्रिया लवकर होते. पैशांची अडचण असेल तेव्हा हा एक सुरक्षित आणि चांगला पर्याय म्हणून पाहिलं जातं.
कारवर कर्ज देण्यापूर्वी बँका त्याच्या किमतीनुसार व्हॅल्यू तपासतात. कार चालविण्यास बंदी घालण्यात आलेल्या कारचे मॉडेल्सवरही कर्ज घेता येत नाही, अशा मॉडेलसाठी जर कर्ज केलात तर तुमचा अर्ज फेटाळला जातो.
कारवर Loan घेतलं तर करातून सूट मिळते का? काय सांगतो नियम
किती मिळणार लोन
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कारच्या विरोधात कर्जाची रक्कम तिच्या व्हॅल्यूच्या 50 ते 150 टक्के असू शकते. कारवरील कर्जाचा कालावधी १२ महिने ते ८४ महिन्यांमध्ये तुम्हाला फेडावी लागते. काही प्रकरणांमध्ये, कर्जाचा कालावधी देखील वाढविला जाऊ शकतो. यासाठी 1 ते 3 टक्के चार्ज द्यावा लागतो. पर्सनल लोनप्रमाणे हे कर्जही कोणतंही टार्गेट पूर्ण करण्यासाठी खर्च करता येतं.
अर्ज कसा करावा
कारवर कर्ज देणाऱ्या अनेक बँका आणि वित्तीय संस्था आहेत. या बँका आणि संस्था कर्जाचे अर्ज ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे अर्ज घेतात. आपल्याला स्वत: साठी बँका शोधाव्या लागतील ज्या कारवर कर्ज देत आहेत. तुम्ही बँकेत जाऊन कारवरील कर्जाच्या अटींची माहिती मिळवू शकता. गाडीवर कर्ज घेताना गाडीच्या मालकाने बँकेच्या वेबसाइटवर जाऊन माहिती घ्यावी.y
Loan घेण्यासाठी CIBIL स्कोअर का महत्त्वाचा, तो कसा सुधारायचा?
कारचे मूल्य शोधा
कर्ज देणाऱ्या बँका आणि वित्तीय संस्था कारचे मूल्य आणि पडताळणी करतात. पूर्व-मंजूर ऑफरच्या बाबतीत, कर्ज देणारी बँक कारवर कर्ज देण्यापूर्वी वाहनाचे मूलभूत मूल्यांकन करते. हवे असल्यास गाडीवर घेतलेले कर्ज तुम्ही मासिक हप्ता (ईएमआय) म्हणून वेळेवर फेडू शकता. ही कर्जे कोणत्याही कारणाने फेडली गेली नाहीत, तर ती गाडी कायदेशीररीत्या जप्त करण्याचा अधिकार बँक किंवा वित्तसंस्थेला आहे. असे कर्ज बुडवल्यास कर्जाची रक्कम फेडण्यासाठी केवळ गाडीचा वापर केला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Instant loans, Loan, Pay the loan