मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Investment Tips: PPF मध्ये गुंतवणूक करणे कधीही फायदेशीर, बँकेपेक्षा किती जास्त मिळतं व्याज?

Investment Tips: PPF मध्ये गुंतवणूक करणे कधीही फायदेशीर, बँकेपेक्षा किती जास्त मिळतं व्याज?

संग्रहित फोटो

संग्रहित फोटो

PPF Investment: सध्या पीपीएफचा व्याजदर 7.1 टक्के आहे. हा अन्य सरकारी गुंतवणूक योजनांच्या व्याजदरापेक्षा निश्चितच जास्त आहे. किसान विकास पत्रासह इतर योजनांचा परतावा यापेक्षा खूप कमी आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 17 सप्टेंबर : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात PPF अकाउंट तुम्ही उघडलं असेल, तर ती चांगली गोष्ट आहे. निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी पीपीएफ हा बचतीचा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये दर वर्षी गुंतवणूक केली तर मॅच्युरिटीपर्यंत  चांगली रक्कम जमा होऊ शकते. तुमची आर्थिक उद्दिष्टं साध्य करण्यातही हा फंड मदत करु शकतो.

`पीपीएफ`चे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम, यामध्ये बचत केल्यास, तुम्हाला आयकर कलम 80 C अंतर्गत करात सूट मिळते. तसंच यामुळे ईईई अर्थात एक्झम्प्ट-एक्झम्प्ट-एक्झम्प्टचा फायदाही मिळतो. याचा अर्थ तुम्ही यात बचत केलेल्या रकमेवर कर आकारला जात नाही. तुमच्या ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर कर आकारला जात नाही. शेवटी, मॅच्युरिटीवर मिळालेल्या एकूण रकमेवरही कर आकारला जात नाही. अशा प्रकारे यातून तीनवेळा करसवलतीचा लाभ मिळतो.

ऑनलाइन शॉपिंग करताना अनेकजण एक चूक करतात! मग खिसा होतो रिकामा, आत्ताच सावध व्हा

एका वर्षात किती रक्कम जमा करता येते?

तुम्ही एका आर्थिक वर्षात पीपीएफ अकाउंटमध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता. तुम्ही बॅंकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ अकाउंट उघडू शकता. चांगली गोष्ट अशी आहे, की तुम्ही यात महिन्याला किंवा वर्षाला पैसे जमा करू शकता. तुम्ही दरवर्षी आयकर रिटर्न भरताना पीपीएफमध्ये जमा केलेल्या रकमेवर करसवलतीचा दावा करू शकता. यामुळे तुमचं करदायित्व कमी होतं.

तुमच्यासाठी क्रेडिट कार्डची निवड कशी कराल? तज्ज्ञांचं सल्ला समजून घ्या

बँक एफडीपेक्षा जास्त व्याज

सध्या पीपीएफचा व्याजदर 7.1 टक्के आहे. हा अन्य सरकारी गुंतवणूक योजनांच्या व्याजदरापेक्षा निश्चितच जास्त आहे. किसान विकास पत्रासह इतर योजनांचा परतावा यापेक्षा खूप कमी आहे. दुसरी चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही पीपीएफ अकाउंट थोडी रक्कम जमा करून सुरू करू शकता. प्रत्येक आर्थिक वर्षात तुम्हाला किमान 500 रुपये जमा करावे लागतील, अशी अट यासाठी आहे. यामध्ये तुम्हाला सलग 15 वर्षं पैसे जमा करावे लागतील. त्यानंतर तुमचं अकाउंट मॅच्युअर होईल.

पीपीएफचं व्याज कसं मोजलं जातं?

पीपीएफमध्ये व्याज  मोजण्यासाठी एक विशेष पद्धत आहे. दर महिन्याच्या 5 तारखेपासून शेवटच्या तारखेपर्यंत (30 किंवा 31 तारखेपर्यंत) अकाउंटमधल्या किमान शिल्लक रकमेवर व्याज आकारलं जातं. 31 मार्चनंतर संपूर्ण आर्थिक वर्षाचं व्याज खातेदाराच्या अकाउंटमध्ये जमा होतं. त्यामुळे तुम्ही प्रत्येक महिन्याच्या 1 ते 4 तारखेदरम्यान पीपीएफ अकाउंटमध्ये पैसे भरल्यास तुम्हाला जास्त व्याज मिळतं.

First published:

Tags: Investment, Money, PPF