मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Stocks to Buy : 'या' तीन स्टॉक्सवर नजर, 2-3 आठवड्यात 28 टक्क्यापर्यंत रिटर्नचा अंदाज

Stocks to Buy : 'या' तीन स्टॉक्सवर नजर, 2-3 आठवड्यात 28 टक्क्यापर्यंत रिटर्नचा अंदाज

निफ्टी 17,600-16,700 च्या दरम्यान फिरताना आपण पाहू शकतो. निफ्टीला दैनंदिन चार्टवर 17,600 च्या पातळीवर जोरदार रजिस्टंन्स आहे. 13 डिसेंबर रोजी निफ्टीने 17,639 चा उच्चांक गाठला, त्यानंतर पुन्हा विक्री दिसून आली आणि निफ्टी 17,180 पर्यंत घसरला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 17 डिसेंबर : शेअर बाजारात (Share MArket) योग्य वेळी योग्य स्टॉकमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरते. सध्या शेअर बाजार डाऊन ट्रेंडमध्ये आहे त्यामुळे योग्य स्टॉक निवडण्याची चांगली संधी आहे. GEPL Capital चे करण पै (Karan Pai) यांच्या मते मीडियम टर्मच्या दृष्टीकोनातून, निफ्टीच्या एका श्रेणीत व्यवहार होण्याची शक्यता आहे. निफ्टी 17,600-16,700 च्या दरम्यान फिरताना आपण पाहू शकतो. निफ्टीला दैनंदिन चार्टवर 17,600 च्या पातळीवर जोरदार रजिस्टंन्स आहे. 13 डिसेंबर रोजी निफ्टीने 17,639 चा उच्चांक गाठला, त्यानंतर पुन्हा विक्री दिसून आली आणि निफ्टी 17,180 पर्यंत घसरला.

या व्यतिरिक्त, आम्ही हे देखील पाहत आहोत की जून 2020 नंतर प्रथमच, 20 दिवसांचा SMA 100 DAY SMA च्या खाली घसरला आहे जो मंदीचा ट्रेड दर्शवत आहे. इतर इंडिकेटर्सवर एक नजर टाकल्यास, डेली टाईम फ्रेमवर RSI 50 पातळीच्या जवळ रजिस्टन्सचा सामना करत आहे आणि ते खाली सरकत असल्याचे दिसते. यामुळेही बाजारावर दबाव निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

फिटनेसवर लक्ष देणाऱ्यांसाठी खास SBI Pulse card; वेलकम बेनिफिट म्हणून 4999 रुपयांचं स्मार्टवॉच फ्री

प्राईज अॅक्शन पाहता, 17,200 ची पातळी निफ्टीसाठी मेक अँड ब्रेक लेव्हल म्हणून काम करेल. जर निफ्टी या पातळीच्या खाली घसरला, तर आपल्याला त्यात आणखी कमकुवतपणा दिसेल आणि निफ्टी आणखी 17,050-17,000 च्या दिशेने जाताना दिसेल. आणि आज तसं दिसत आहे. करण पै यांनी शिफारस केलेल्या स्टॉकवर नजर टाकूया.

टॉप 3 स्टॉक जे 2-3 आठवड्यांत जोरदार रिटर्न्स देतील

बजाज इलेक्ट्रिकल्स (Bajaj Elkectricals): BUY | LTP: 1259.45 रुपये | या शेअरमध्ये 1190 च्या स्टॉप लॉससह खरेदी सल्ला देण्यात आला आहे, तर 1442 रुपयांची टार्गेट प्राईज असेल. हा स्टॉक 2-3 आठवड्यात 14 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.

एका वर्षात पेनी स्टॉकमुळे गुंतवणूकदारांचे 1 लाख बनले 20 लाख; तुमच्याकडे आहे का?

बिर्लासॉफ्ट (Birlasoft): BUY | LTP: 505.30 रुपये | या शेअरमध्ये 455 रुपयांच्या स्टॉप लॉससह खरेदीचा सल्ला आणि 647 या शेअरची टार्गेट प्राईज असेल. हा स्टॉक 2-3 आठवड्यांत 28 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.

कजारिया सिरॅमिक्स (Kajaria Ceramics) : BUY | LTP: 1223 रुपये | हा शेअर 1150 च्या स्टॉप लॉससह खरेदी सल्ला देण्यात आला असून, 1441 रुपये टार्गेट प्राईज असेल. 2-3 आठवड्यांत हा स्टॉक 17-18 टक्क्यांपर्यंत परतावा देऊ शकतो.

First published:

Tags: Investment, Money, Share market