मराठी बातम्या /बातम्या /मनी /Short Picks : शॉर्ट टर्ममध्ये चांगले रिटर्न देणारे स्टॉक्स; डबल डिजिट कमाईची संधी

Short Picks : शॉर्ट टर्ममध्ये चांगले रिटर्न देणारे स्टॉक्स; डबल डिजिट कमाईची संधी

SMC GLOBAL SECURITIES चे क्षितिज गांधी (SHITIJ GANDHI) यांच्या मते, येत्या सत्रात बाजारात हाय लेव्हलवर कन्सॉलिडेशन पाहायला मिळू शकेल. परंतु मार्केट ट्रेंड तेजीत राहील.

SMC GLOBAL SECURITIES चे क्षितिज गांधी (SHITIJ GANDHI) यांच्या मते, येत्या सत्रात बाजारात हाय लेव्हलवर कन्सॉलिडेशन पाहायला मिळू शकेल. परंतु मार्केट ट्रेंड तेजीत राहील.

SMC GLOBAL SECURITIES चे क्षितिज गांधी (SHITIJ GANDHI) यांच्या मते, येत्या सत्रात बाजारात हाय लेव्हलवर कन्सॉलिडेशन पाहायला मिळू शकेल. परंतु मार्केट ट्रेंड तेजीत राहील.

मुंबई, 10 नोव्हेंबर : भारतीय बाजारात या आठवड्याची सुरुवात पॉझिटिव्ह झाली. बुल्सने पुन्हा एकदा वापसी केली आणि निफ्टीने पुन्हा एकदा 18000 चा टप्पा पार केल्याचे दिसून आले. ऑटो (Auto) आणि एनर्जी (Energy) शेअर्स बाजारात चमकले, परंतु आतापर्यंत बँकिंग शेअर्समध्ये कमजोरी दिसून आली.

डेरिव्हेटिव्ह्ज वर नजर टाकली तरी 18,100 आणि 18,200 च्या स्ट्राइकवर CALL रायडर अॅक्टिव्ह दिसले. तर PUT रायटर्स 17,900 च्या स्ट्राइकमध्ये मोठ्या प्रमाणात ओपन इंटरेस्ट जोडताना दिसले. टेक्निकल फ्रंटवर निफ्टी पुन्हा एकदा डेली चार्टवर 20 Day EMA वर बंद करण्यात यशस्वी झाला आहे. जे येत्या ट्रेडिंग सत्रात तेजीचे लक्षण आहे.

SMC GLOBAL SECURITIES चे क्षितिज गांधी (SHITIJ GANDHI) यांच्या मते, येत्या सत्रात बाजारात हाय लेव्हलवर कन्सॉलिडेशन पाहायला मिळू शकेल. परंतु मार्केट ट्रेंड तेजीत राहील. कन्सॉलिडेशन 18,300-17,800 च्या रेंजवर पाहिलं जाऊ शकतं. येत्या सत्रात बाजारात अस्थिरता दिसून येईल. त्यामुळे निवडक स्टॉकवरच ट्रेड करण्याची रणनिती वापरली पाहिजे.

'या' बँकेच्या ग्राहकांना झटका! 1 डिसेंबरपासून बचत खात्याबाबत होतोय बदल, तुमच्या खिशावर होईल थेट परिणाम

तीन स्टॉक जे 2-3 आठवड्यात डबल डिजिट कमाई करु शकतात

Bharat Forge : BUY | LTP: 834.05 रुपये

या स्टॉकमध्ये 760 च्या स्टॉप लॉससह खरेदी करुन 941 रुपयांची टार्गेट प्राईज ठेवावी. हा स्टॉक 2-3 आठवड्यात 12.8 टक्क्यांपर्यंत रिटर्न देऊ शकतो.

एका महिन्यात होणार 25 लाख विवाह; 3 लाख कोटीहून अधिक उलाढालीची अपेक्षा- CAIT

Kopran: BUY | LTP : 235.70 रुपये

या स्टॉकमध्ये 208 च्या स्टॉप लॉससह खरेदी करुन 270 रुपयांची टार्गेट प्राईज ठेवावी. हा स्टॉक 2-3 आठवड्यात 14.6 टक्क्यांपर्यंत रिटर्न देऊ शकतो.

JK Cement : BUY | LTP: 3654.95 रुपये

हा शेअर 4200 च्या टार्गेक प्राईजवर खरेदी करता येईल. तर 3,250 चा स्टॉप लॉस लावावा. येत्या 2-3 आठवड्यांत हा स्टॉक 14.9 टक्क्यांपर्यंत रिटर्न देऊ शकतो.

(Disclaimer:बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. News18Lokmat.com कोणालाही गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही.)

First published:

Tags: Investment, Money, Share market