मराठी बातम्या /बातम्या /मनी /

होंडा कंपनीने कर्मचाऱ्यांना परत मागितला बोनस! अचानक आलेल्या मेमोने कर्मचारी चक्रावले

होंडा कंपनीने कर्मचाऱ्यांना परत मागितला बोनस! अचानक आलेल्या मेमोने कर्मचारी चक्रावले

Honda Seeks Refund Of Overpays Bonus: होंडा कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेला बोनस परत मागवला आहे.

Honda Seeks Refund Of Overpays Bonus: होंडा कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेला बोनस परत मागवला आहे.

Honda Seeks Refund Of Overpays Bonus: होंडा कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेला बोनस परत मागवला आहे.

मुंबई, 23 सप्टेंबर : बोनस ही कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणारी गोष्ट असते. कंपनीच्या फायद्यातला वाटा या माध्यमातून कर्मचाऱ्यांना दिल्यामुळे कंपनी व कर्मचाऱ्यांचे संबंध अधिक दृढ होतात. जवळपास प्रत्येक कंपनी कमी-अधिक प्रमाणात बोनस देते; मात्र दिलेला बोनस परत मागण्याची वेळ येणं तसं दुर्मीळच. होंडा या जपानी ऑटोमेकर कंपनीने अलीकडेच कर्मचाऱ्यांना दिलेला बोनस परत मागितला. होंडा कंपनीचं एक कार्यालय अमेरिकेत ओहियो राज्यातल्या मॅरिसव्हिले शहरात आहे. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आधी कंपनीनं बोनस देऊन खूश केलं. नंतर मात्र जादाचा बोनस परत मागितला. कंपनीनं कर्मचाऱ्यांना मेमो पाठवून जादा बोनस रक्कम परत देण्याविषयी सांगितलं आहे. या कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून मिळणं अपेक्षित असलेल्या रकमेपेक्षा अतिरिक्त रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली होती. कंपनीच्या या धोरणाबाबत कर्मचाऱ्यांमध्ये द्विधा मनस्थिती असल्याचं बिझनेस टुडेच्या रिपोर्टमध्ये एनबीसीच्या माहितीच्या आधारे सांगण्यात आलंय. कंपनीनं कर्मचाऱ्यांना ही अतिरिक्त रक्कम लवकरात लवकर परत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी या मेमोला उत्तर दिलं नाही, किंवा दुर्लक्ष केलं, तर त्यांच्या पगारातून ती रक्कम कापून घेण्यात येईल, असंही कंपनीनं सांगितलं आहे. वाचा - रुपीनंतर महाराष्ट्रातील आणखी एका बँकेला दणका; RBI कडून परवाना कायमस्वरुपी रद्द या महिन्याच्या सुरुवातीला होंडा मोटर्स कंपनीने त्यांच्या असोसिएट्सना बोनस दिला होता. त्याच दरम्यान काही कर्मचाऱ्यांना जास्त रक्कम दिली गेली. तीच रक्कम आता कंपनी परत मागते आहे; मात्र कंपनीच्या या सूचनेची अंमलबजावणी करणं कर्मचाऱ्यांसाठी अवघड झालं आहे. ही रक्कम परत करणं त्यांच्या कुटुंबासाठी त्रासदायक ठरू शकतं, असं काही कर्मचाऱ्यांना वाटत आहे. मेमोबाबत उत्तर देण्यासाठी कंपनीनं कर्मचाऱ्यांना 22 सप्टेंबरपर्यंतचा अवधी दिला होता. ही जादा रक्कम कर्मचारी कोणत्या मार्गानं परत करणार आहे, त्याबाबत यात कळवणं गरजेचं होतं. होंडाच्या प्रवक्त्याने ई-मेलद्वारे आपली बाजू मांडताना सांगितलं, की कर्मचाऱ्यांचं मानधन हा संवेदनशील विषय असून, त्याबाबत कर्मचाऱ्यांना कमीत कमी त्रास होईल, अशी पावलं उचलली जात आहेत. जास्त बोनस मिळाल्याचा या कर्मचाऱ्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. दरम्यानच्या काळात त्यांनी ते पैसे काही गरजेसाठी खर्च करून टाकले असतील, तर त्यांच्यावर मोठीच नौबत येणार आहे.
First published:

Tags: Law

पुढील बातम्या