होमलोन आणि कारलोन होणार स्वस्त, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

होमलोन आणि कारसाठीचं कर्ज घेणं आता सोपं होणार आहे. हे कर्ज स्वस्त करण्याला बँकांनी मंजुरी दिली आहे, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. कर्ज मंजूर झालं आहे की नाही याबद्दल ग्राहक ऑनलाइन पडताळणी करू शकतात.

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2019 06:25 PM IST

होमलोन आणि कारलोन होणार स्वस्त, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट : होमलोन आणि कारसाठीचं कर्ज घेणं आता सोपं होणार आहे. रेपो रेटनुार हे कर्ज स्वस्त करण्याला बँकांनी मंजुरी दिली आहे, असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. कर्ज मंजूर झालं आहे की नाही याबद्दल ग्राहक ऑनलाइन पडताळणी करू शकतात, असं त्या म्हणाल्या. कार उद्यागोबद्दल निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केली. BS 4 गाड्या बंद होणार नाहीत, मार्च 2020 पर्यंत या गाड्या सुरूच राहतील, असं त्यांनी सांगितलं.

Loading...

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल त्यांनी एक सादरीकरण केलं. भारताची अर्थव्यवस्था जगाच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे, असं त्या म्हणाल्या. चीन, अमेरिका, जर्मनी, यूके, फ्रान्स, कॅनडा, इटली, जपान यांच्य तुलनेत भारताच्या GDP च्या वाढीचा दर जास्त आहे, असं त्यांनी सांगितलं. बँकांसाठी सरकार 70 हजार कोटींचा निधी देणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली. FPI वरचा सरचार्ज रद्द करण्यात आला आहे, असंही त्या म्हणाल्या. प्रामाणिक करदात्यांना हैराण केलं जाणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

===========================================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 06:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...