Home /News /money /

गृहकर्जधारकांसाठी SBIचं गिफ्ट; बँक प्रक्रिया शुल्काचे हजारो रुपये वाचणार

गृहकर्जधारकांसाठी SBIचं गिफ्ट; बँक प्रक्रिया शुल्काचे हजारो रुपये वाचणार

तुमचं घर घेण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. गृहकर्जधारकांसाठी SBIने विशेष ऑफर्स आणल्या आहेत.

    मुंबई, 17 नोव्हेंबर: तुम्ही जर घर घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गृहकर्जावर स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) जबरदस्त ऑफर दिली आहे.SBI ने ग्राहकांना गृहकर्ज दरामध्ये (Home Loan) 0.25 टक्के सूट देणार आहे. कर्ज घेणाऱ्यांची प्रोसेसिंग फी माफ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांचा हजारो रुपये वाचणार आहेत. SBI मध्ये गृहकर्ज घेण्यासाठी वार्षिक व्याजदर 6.90 टक्के आहे. इतर बँकांमध्ये हा व्याजदर 8 ते 9% आहे. हा व्याज दर 30 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर लागू होतो.  SBI च्या ऑफरमध्ये विशेष काय? SBI फेस्टीव्ह सिझनमध्ये 0.25 टक्के सूट देण्यात आली आहे. ग्राहकांना प्रोसेसिंग फी माफ एसबीआय मोबाईल अ‍ॅप योनो (YONO)च्या माध्यमातून विशेष सूट 30 लाख रुपयापर्यंतच्या गृहकर्जाला 6.90% व्याजदर (इतर बँकेंच्या तुलनेत सर्वात कमी) एसबीआयच्या गृहकर्जावर 75 लाख रुपयांपर्यंतच्या घर खरेदीसाठी 0.25 टक्के व्याजावर सवलत मिळणार आहे. ही सूट सीआयबीआयएलच्या स्कोअरवर आधारित असेल. त्यामुळे ज्यांना स्वत:चं घर विकत घ्यायचं असेल त्यांनी एसबीआय होम लोन्सचा एकदा विचार करायला हरकत नाही.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Sbi home loan

    पुढील बातम्या