गृहकर्जाचं टेन्शन नको, LIC नं आणलीय ही नवी योजना

गृहकर्जाचं टेन्शन नको, LIC नं आणलीय ही नवी योजना

LIC, Home Loan - भारतीय जीवन विमा निगमची ( LIC ) सहयोगी कंपनी एलआयसी हाउसिंग फायनान्सनं गृहकर्जासाठी नवी योजना आणलीय

  • Share this:

मुंबई, 6 जुलै : भारतीय जीवन विमा निगमची ( LIC ) सहयोगी कंपनी एलआयसी हाउसिंग फायनान्सनं गृहकर्जासाठी नवी योजना आणलीय. यात लोकांना 75 वर्षापर्यंत गृहकर्ज देता येईल. याचा फायदा असा होईल की व्यक्तीवर कर्जाचं ओझं कमी होईल. गृहकर्ज जास्त काळासाठी घेतलं तर त्याचे हप्ते कमी होतात. ज्यांना नियमित पगार नसतो, त्यांच्यासाठी हे फायदेशीर असतं. कंपनी अशा लोकांनाही कर्ज देते ज्यांची काही क्रेडिट हिस्ट्री नाही.

75 वर्षापर्यंत द्या कर्जाचं EMI

LIC HF नं 75 वर्षापर्यंत कर्ज फेडण्याची सवलत दिलीय. या योजनेत इंडिया माॅर्टगेज गॅरन्टी काॅर्पोरेशन ( IMGC ) सोबत करार केलाय. या योजनेसाठी कर्ज गॅरेंटी आयएमजीसी उपलब्ध करून देईल. आयएमजीसी कर्जाच्या 20 टक्के रक्कम गॅरन्टी घेईल.

SBI च्या ग्राहकांसाठी खुशखबर, 'असा' होईल फायदा

गहाण ठेवल्याच्या बदल्यात कर्ज

एलआयसी हाउसिंग फायनान्सच्या या योजेत आयएमजीसी ग्राहकांना गृहकर्ज मिळवण्यासाठी काही तरी गहाण ठेवावं लागेल. ज्यांची क्रेडिट हिस्ट्री चांगली नाही, त्यांनाही कर्ज मिळेल. वर्क प्रोफाइल चांगला नसलेल्यांनाही कर्ज मिळेल. पण एखादी मोठी वस्तू गहाण ठेवावी लागेल.

घरबसल्या सुरू करा हा व्यवसाय आणि वर्षाला कमवा लाखो रुपये

एलआयसीशी अनेकांचा संबंध पाॅलिसीपुरता येतो.अनेकदा लोक LICची पाॅलिसी खरेदी केल्यावर खूश होत नाहीत. पाॅलिसी घेतल्यानंतर आपण उगाच ही पाॅलिसी घेतली असं त्यांना वाटत राहतं. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की पाॅलिसी घेतल्यानंतर तुम्ही ते पैसे परत घेऊ शकता. हा आहे फ्री लुक पीरियड. याचा फायदा तुम्ही 15 दिवसांमध्ये घेऊ शकता. या काळात तुम्ही पाॅलिसी परत करू शकता.

आठवडा सुरळीत जाण्यासाठी दर रविवारी करा 'या' 5 गोष्टी

फ्री लुक पीरियड हा कमीत कमी 3 वर्षाची जीवन विमा पाॅलिसी किंवा स्वास्थ्य विमा पाॅलिसीवर लागू होते. तुम्ही पाॅलिसीचे कागद मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत याचा उपयोग करू शकता.

पाहा VIDEO : काही सेकंदांमध्येच पत्त्यांप्रमाणे कोसळला पूल, अन्....

First published: July 6, 2019, 7:11 PM IST
Tags: LIC

ताज्या बातम्या