Home /News /money /

घर घेण्याचं स्वप्न करा पूर्ण! वाचा कोणत्या बँका देतायंत स्वस्त Home Loan, किती भरावा लागेल EMI?

घर घेण्याचं स्वप्न करा पूर्ण! वाचा कोणत्या बँका देतायंत स्वस्त Home Loan, किती भरावा लागेल EMI?

कोरोनाच्या काळात रिअल इस्टेट सेक्टरमध्ये मंदी आली आहे. त्यामुळे घर घेणं सामान्यांच्या काहीसं आवाक्यात आलं आहे. पण जर तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर पहिला प्रश्न असाच असेल की सगळ्यात स्वस्त व्याज दर कुठल्या बँकेत आहेत?

मुंबई, 13 जुलै: प्रत्येकाला वाटतं आपलं स्वत:चं घर असावं. पण नवीन घर घ्यायचं किंवा बांधायचं म्हटलं तरीही मोठा खर्च येतो. तेवढा पैसा सामान्य मध्यमवर्गीयांकडे नसतो. त्यामुळे त्यांना पर्याय असतो बँकेतून गृह कर्ज (Home Loan) घेण्याचा. त्याशिवाय हे घराचं स्वप्न पूर्ण करणं अवघडच असतं. हे कर्ज कमी व्याज दराने मिळतं पण दीर्घकालीन असतं त्यामुळे घेतलेल्या कर्जाच्या जवळजवळ दुप्पट रक्कम कर्जदार बँकेला परत करत असतो. पण स्वत: च्या घरात राहण्याचं समाधान मिळाल्याने तो नंतर कष्ट करून ते कर्ज फेडतो. कोरोनाच्या काळात रिअल इस्टेट सेक्टरमध्ये मंदी आली आहे. त्यामुळे घर घेणं सामान्यांच्या काहीसं आवाक्यात आलं आहे. पण जर तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर पहिला प्रश्न असाच असेल की सगळ्यात स्वस्त व्याज दर कुठल्या बँकेत आहेत? जाणून घ्या सविस्तर कोणत्या बँकेत द्यावं लागेल किती व्याज? -कोटक महिंद्रा बँक 20 वर्षांसाठीच्या 30 लाख रुपयांच्या गृह कर्जासाठी तुम्हाला 6.65 ते 7.30 टक्के या दराने व्याज आकारेल. त्यामुळे तुम्हाला हे कर्ज मिळालं तर दरमहा 22 हजार 633 ते 23 हजार 802 रुपये एवढा EMI भरावा लागेल. एकूण दिलेल्या कर्जाच्या दोन टक्के रकमेसह जीएसटीची रक्कम ही तुमच्याकडून कर्जाची प्रोसेसिंग फी म्हणून घेतली जाईल. -त्यानंतर आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँकेत 20 वर्षांसाठीच्या 30 लाख रुपयांच्या गृह कर्जासाठी तुम्हाला 6.75 ते 8.05 टक्के या दराने व्याज आकारलं जाईल. त्यामुळे तुम्हाला हे कर्ज मिळालं तर दरमहा 22 हजार 811 ते 25 हजार 187 रुपये एवढा EMI भरावा लागेल. एकूण दिलेल्या कर्जाच्या 0.50 टक्के रकमेसह जीएसटीची रक्कम ही तुमच्याकडून कर्जाची प्रोसेसिंग फी म्हणून घेतली जाईल. हे वाचा-Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण, 10000 रुपयांनी स्वस्त आहे सोनं -तिसऱ्या क्रमांकावर BoB. बँक ऑफ बडोदा बँक 20 वर्षांसाठीच्या 30 लाख रुपयांच्या गृह कर्जासाठी तुम्हाला 6.75 ते 8.60 टक्के या दराने व्याज आकारेल. त्यामुळे तुम्हाला हे कर्ज मिळालं तर दरमहा 22 हजार 811 ते 26 हजार 225 रुपये एवढा EMI भरावा लागेल. ही बँक तुमच्याकडून कर्जाची प्रोसेसिंग फी म्हणून कमीतकमी 8500 रुपयांपासून ते जास्तीत जास्त 25 हजार रुपये घेईल. -20 वर्षांसाठीच्या 30 लाख रुपयांच्या गृह कर्जासाठी तुम्हाला आयसीआयसीआय बँक 6.75 ते 7.55 टक्के या दराने व्याज आकारेल. त्यामुळे तुम्हाला हे कर्ज मिळालं तर दरमहा 22 हजार 811 ते 24 हजार 260 रुपये एवढा EMI भरावा लागेल. ही तुमच्याकडून कर्जाची प्रोसेसिंग फी म्हणून 2 हजार रुपये घेईल. -20 वर्षांसाठीच्या 30 लाख रुपयांच्या गृह कर्जासाठी तुम्हाला एचडीएफसी बँक 6.75 ते 7.65 टक्के या दराने व्याज आकारेल. त्यामुळे तुम्हाला हे कर्ज मिळालं तर दरमहा 22 हजार 811 ते 24 हजार 444 रुपये एवढा EMI भरावा लागेल. ही तुमच्याकडून कर्जाची प्रोसेसिंग फी म्हणून 4 हजार रुपये आणि जीएसटीची रक्कम घेईल. हे वाचा-उद्यापासून आहे बंपर कमाईची संधी, 14040 रुपयांची गुंतवणूक करून व्हाल मालामाल -20 वर्षांसाठीच्या 30 लाख रुपयांच्या गृह कर्जासाठी तुम्हाला युनियन बँक ऑफ इंडिया 6.80 ते 7.40 टक्के या दराने व्याज आकारेल. त्यामुळे तुम्हाला हे कर्ज मिळालं तर दरमहा 22 हजार 900 ते 23 हजार 985 रुपये एवढा EMI भरावा लागेल. ही तुमच्याकडून कर्जाची प्रोसेसिंग फी म्हणून 15 हजार रुपये आणि जीएसटीची रक्कम घेईल. -पंजाब नॅशनल बँकेत तुम्ही 20 वर्षांसाठीच्या 30 लाख रुपयांच्या गृह कर्जासाठी अर्ज केलात तर तुम्हाला 6.85 ते 9.00 टक्के या दराने व्याज आकारेल. त्यामुळे तुम्हाला हे कर्ज मिळालं तर दरमहा 22 हजार 900 ते 26 हजार 992 रुपये एवढा EMI भरावा लागेल. ही तुमच्याकडून कर्जाची प्रोसेसिंग फी म्हणून 15 हजार रुपये आणि जीएसटीची रक्कम घेईल. -सेंट्रल बैंक 6.85-7.30 टक्के व्याज दरावराने कर्ज मिळणार असून त्याला 22,990-23,802 रुपये ईएमआय तुम्हाला दरमहा भरावा लागेल. यात 20 हजार रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल. -पंजाब अँड सिंध बँक गृह कर्जाला 6.85-7.60 व्याज दर असेल 22,990-24,352 रुपये दरमहा ईएमआय भरावा लागेल. कर्जाच्या रकमेच्या 0.25 टक्के प्रोसेसिंग फी द्यावी लागेल. -बँक ऑफ इंडियामधून जर तुम्ही गृह कर्ज घेणार असाल तर तुम्हाला 6.85-8.85 टक्के व्याज दर मिळेल. दरमहा 22,990-26,703 रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. जास्तीत जास्त 50,000 रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल. -इंडियन बँक 6.85-8.00 टक्के व्याज दराने कर्ज देईल म्हणजे तुम्हाला 22,990-25,093 रुपये ईएमआय पडेल आणि जास्तीत जास्त 20,000 रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल. -आईडीएफसी फर्स्ट बँक 6.90-8.50 टक्के व्याजाने कर्ज देईल आणि तुम्हाला दरमहा 23,079-26.035 रुपयांचा ईएमआय द्यावा लागेल तर 10,000 रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल. -अॅक्सिस बँक 6.90-8.40 टक्के व्याज दराने दरमहा 23,079-25,845 रुपये ईएमआय भरावा लागेल कर्जाच्या रकमेच्या 1 टक्क्यापर्यंत प्रोसेसिंग फी भरावी लागेल.
First published:

Tags: Home Loan, Sbi home loan

पुढील बातम्या