Home /News /money /

महिलांसाठी Home Loan घेणे स्वस्त आणि सोपं? कमी व्याजदरासह आणखी सुविधा मिळतात

महिलांसाठी Home Loan घेणे स्वस्त आणि सोपं? कमी व्याजदरासह आणखी सुविधा मिळतात

Home Loan: महिलांना गृहकर्ज घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज देणाऱ्या संस्था उत्कृष्ट पॅकेजेस, कमी प्रक्रिया शुल्क आणि इतर सवलती देतात.

    मुंबई, 24 जून : घराचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणून होम लोनची मोठी मदत होते. मात्र होम लोन घेण्याची प्रोसेस थोडी किचकट असते. मात्र घर घेताना होम लोन घेणे पुरुषांपेक्षा महिलांना सहज आणि सोपं आहे. CRIFF हायमार्कच्या अहवालानुसार, महिला कर्जदारांमध्ये डीफॉल्ट दर 0.63 टक्के आहे, जो पुरुष कर्जदारांच्या तुलनेत 15 बेसिस पॉइंटने कमी आहे. त्यामुळे बँका महिला कर्जदारांवर अधिक विश्वास ठेवतात. महिलांना गृहकर्ज घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज देणाऱ्या संस्था उत्कृष्ट पॅकेजेस, कमी प्रक्रिया शुल्क आणि इतर सवलती देतात. EasyLone चे संस्थापक आणि CEO प्रमोद कथुरिया, एक महिला म्हणून तुम्हाला गृहकर्जासह कोणते फायदे मिळतात याची माहिती दिली. सुलभ कर्ज मंजूरी सरकारच्या उपक्रमामुळे परवडणाऱ्या घरासांठी गृहकर्जासाठी अर्ज करणाऱ्या महिलांना मिळणाऱ्या लाभांमध्ये वाढ झाली आहे. प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) योजना सुरू झाल्यामुळे, गृहकर्जासाठी अर्ज करणाऱ्या महिलांच्या संख्येत 6% वाढ झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना मालमत्तेचे सह-मालक असणे आवश्यक आहे आणि त्यांना 2.67 लाख रुपयांचे व्याज अनुदान देखील मिळते. कर्जामध्ये महिलांचा समावेश केल्याने प्रक्रिया सुलभ आणि जलद होते. महिला अर्जदारांना मुद्रांक शुल्कात सूट खरेदीदाराने भरलेल्या प्रत्येक मालमत्तेच्या व्यवहारावर सरकार मुद्रांक शुल्क आकारते. आकारण्यात येणार्‍या शुल्काची रक्कम घराच्या खरेदी किमतीच्या टक्केवारीवर आधारित असते आणि बहुतेक लोक ते कर्जाचा एक भाग मानतात कारण बँका ही रक्कम देखील देतात. पुरुषांच्या तुलनेत महिलांना मुद्रांक शुल्कावर 1-2% सूट मिळते, ज्यामुळे त्यांच्यासाठी कर्ज स्वस्त होते. अधिक कर सूट महिलांना त्यांच्या गृहकर्जाच्या परतफेडीवर अधिक आयकर सवलती मिळतात. आयकराच्या कलम 80C अंतर्गत महिलांना व्याजावर 2 लाख रुपयांची सूट आणि 1.5 लाख रुपयांपर्यंत सूट मिळते. हा लाभ सर्व गृहकर्ज कर्जदारांसाठी उपलब्ध असला तरी, महिलांसाठी तो अधिक प्रभावी आहे कारण त्यांना आधीपासून प्राप्तिकर कायद्यांतर्गत 3 लाख रुपयांची थेट कर सूट देण्यात आली आहे, जी पुरुषांसाठी 2.5 लाख आहे. कमी व्याज दर ऑफर बहुतेक बँका महिलांना अधिक विश्वासार्ह कर्जदार मानतात आणि त्यांच्या चांगल्या क्रेडिट हिस्ट्रीमुळे कमी व्याजदर देतात. SBI सुद्धा महिलांना पुरुषांपेक्षा 0.05%-0.1% कमी व्याजाने गृहकर्ज देत आहे. कर्जाची परतफेड करण्यासाठी दीर्घ कालावधी गृहकर्ज हे दीर्घ कालावधीत फेडले जाणारे कर्ज आहे आणि त्याचा सामान्य कालावधी 25 वर्षे आहे, परंतु महिलांसाठी ते 30 वर्षे ठेवण्यात आले आहे. वयाची 70 वर्षे पूर्ण होईपर्यंत गृहकर्जाची परतफेड करता येते. हे महिलांसाठी मासिक EMI ओझे कमी करते.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Home Loan, Money

    पुढील बातम्या