मराठी बातम्या /बातम्या /मनी /

हक्काचं घर सुरक्षित ठेवण्यासाठी होम इन्शुरन्स किती गरजेचा, तुम्ही काढलाय का?

हक्काचं घर सुरक्षित ठेवण्यासाठी होम इन्शुरन्स किती गरजेचा, तुम्ही काढलाय का?

घर घेत असताना घराचा विमाही काढला जातो. परंतु, त्याचा अवधी संपल्यानंतर लगेच त्याचं नूतनीकरण करणं आवश्यक असते.

घर घेत असताना घराचा विमाही काढला जातो. परंतु, त्याचा अवधी संपल्यानंतर लगेच त्याचं नूतनीकरण करणं आवश्यक असते.

घर घेत असताना घराचा विमाही काढला जातो. परंतु, त्याचा अवधी संपल्यानंतर लगेच त्याचं नूतनीकरण करणं आवश्यक असते.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई: आपल्या स्वप्नातलं घर व्हावं, असं प्रत्येकाला वाटत असतं. प्रत्येक जण आपापली गरज व बजेटनुसार घर विकत घेत किंवा बांधत असतो. आयुष्यात पण पै न् पै जोडून घेतलेलं घर सुरक्षित असायला हवं असं प्रत्येकाला वाटतं. अशावेळी होम इन्शुरन्सचा विचार करणं फार महत्त्वाचं आहे.

घर घेत असताना घराचा विमाही काढला जातो. परंतु, त्याचा अवधी संपल्यानंतर लगेच त्याचं नूतनीकरण करणं आवश्यक असते. घराच्या सुरक्षिततेसाठी वार्षिक होम इन्शुरन्सचे नूतनीकरण करणं फार गरजेचं आहे.

घराची सुरक्षितता कायम ठेवण्यासाठी घर घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला उत्तम होम इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. एखादं नैसर्गिक संकट ओढवलं, मालमत्तेला आग लागली, घरात चोरी झाली तर होम इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळवता येते. याचा लाभ घेण्यासाठी वेळोवेळी होम इन्शुरन्स पॉलिसीचं नूतनीकरण करणंही आवश्यक आहे.

होम इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली असल्यास या पॉलिसी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. होम इन्शुरन्स पॉलिसी घेताना तुम्ही किती प्रीमिअम भरत आहात यासह जोखीम कालावधी आणि तुमच्या पॉलिसीत समाविष्ट असलेल्या गोष्टींची माहिती जाणून घेणं फार आवश्यक आहे.

होम इन्शुरन्स पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी याचा कालावधी आणि नूतनीकरणाची तारीख लक्षात ठेवणही तितकंच गरजेचं आहे. होम इन्शुरन्स पॉलिसी दोन प्रकारच्या असतात. एक सर्वसाधारण पॉलिसी आणि दुसरी दीर्घकाळासाठीची पॉलिसी.

ऑनलाईन होम लोनसाठी कसा करायचा अर्ज, त्याचे काय फायदे आहेत?

सर्वसाधारण पॉलिसीमध्ये घराला एक ते तीन वर्ष किंवा त्यापेक्षा थोड्या अधिक कालावधीसाठी संरक्षण दिलं जाऊ शकतं. याचा कालावधी कमी असतो त्यामुळे यात जोखीमही कमी आहे.

दुसरीकडे, दीर्घकाळासाठीच्या पॉलिसीत मालमत्तेला अनेक वर्ष संरक्षण दिलं जाऊ शकते. या पॉलिसीचा कालावधी 30 वर्षांपर्यंत असू शकतो. त्यामुळे भविष्यात दीर्घकाळासाठीची जोखीम यात वाढत असते. या कारणाने विमा कंपन्यांकडून पॉलिसी महाग विकली जाते.

दरवर्षी होम इन्शुरन्सचे नूतनीकरण करणे आवश्यक आहे का?

होम इन्शुरन्स पॉलिसीच्या नूतनीकरणासंदर्भात समजून घ्यायचे असल्यास पॉलिसीच्या कालावधीचं मूल्यांकन करावं लागेल. आपलं घर आणि त्यातील साहित्य याला आपल्या पॉलिसीत एक वर्षापर्यंत संरक्षण असेल तर इन्शुरन्स पॉलिसीचं दरवर्षी नूतनीकरण करायला हवं. परंतु, दीर्घकाळासाठी पॉलिसी असेल तर याचा कालावधी संपण्याच्या आधी पॉलिसीचं नूतनीकरण करणं गरजेचं आहे.

होम लोन ट्रान्सफर करताना तुम्ही केलीय का ही चूक, वेळीच सुधारा

होम इन्शुरन्स पॉलिसी नूतनीकरणाचे फायदे

होम इन्शुरन्स पॉलिसीचं नूतनीकरण केल्यास तुमची बचत कायम राहते. स्वतःचं घर त्यातील साहित्य आणि अतिरिक्त पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळते. भविष्यात तुम्हाला घर विकायचे असल्यास खरेदीदारासाठीही ही बाब आकर्षक ठरू शकते.

घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीकडे पॉलिसी हस्तांतरित होत नाही. परंतु, घराच्या देखभालीसाठी तुम्ही किती सजग आहात हे खरेदीदाराला कळू शकतं. होम इन्शुरन्स पॉलिसीचं वेळोवेळी नूतनीकरण करत असाल तर आपलं घर आणि त्यातील साहित्याच्या किमतीबद्दल अपडेट राहण्यास मदत मिळते.

आपली मालमत्ता येणाऱ्या पिढीसाठी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने होम इन्शुरन्स पॉलिसी महत्त्वाची ठरते. होम इन्शुरन्स पॉलिसीचे वेळोवेळी नूतनीकरण केल्यास तुमची मालमत्ता आणि त्यातील साहित्य दीर्घकाळासाठी सुरक्षित ठेवता येईल.

First published:

Tags: Home Loan, Instant loans, Loan, Pay the loan