नवी दिल्ली, 14 नोव्हेंबर : भारतीय अर्थव्यवस्थेची सर्व क्षेत्रांमध्ये भरभराट होत आहे. वस्तू आणि सेवांच्या निर्यातीच्या बाबतीत देश ऐतिहासिक उच्चांकाकडे वाटचाल करत आहे. जागतिक पुरवठा साखळी राखण्यासाठी जगात सर्वत्र भारताला विश्वासार्ह जागतिक भागीदार मानले जात आहे, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल सांगितले. आज दिल्ली येथे 40 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे (IITF ) उदघाटन प्रंसगी ते बोलत होते.
लॉकडाऊन काळातही (Lockdown Period) भारताने जागतिक समुदायाला सेवा सहाय्य पुरवण्यात कोणतीही कसर ठेवली नाही. भारताने थेट विदेशी गुंतवणूकीचा (FDI) ऐतिहासिक उच्चांकही गाठला आहे. सुरुवातीच्या 4 महिन्यांतील आतापर्यंतची सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणूक (FDI) गेल्या वर्षीच्या कालावधीपेक्षा ते 62 टक्के जास्त आहे. भारत पुन्हा एकदा आर्थिक वेग गाठत आहे, हे भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा ( IITF) दर्शवेल, असंही पियुष गोयल यांनी म्हटलं. उत्तम पायाभूत सुविधा, मागणी आणि वाढ आणि विकासातील विविधता ही एका चांगल्या आणि नवीन भारताची आकांक्षा बनेल, असंही ते म्हणाले.
SBI ची खास सुविधा, एटीएम कार्ड नसतानाही काढा पैसे; काय आहे प्रोसेस?
भारत जगातील उद्योग आणि सेवांचे केंद्र बनू शकतो. भारतीय उद्योग गुणवत्ता, स्पर्धात्मकता आणि अर्थव्यवस्थेचे टप्पे यांचे नवनवीन उच्चांक गाठू शकतो. भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा (IITF) ‘लोकल गोज ग्लोबल’ आणि ‘मेक इन इंडिया’ फॉर द वर्ल्ड’ हे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करेल, असं पियुष गोयल यांनी म्हटलं.
राज्यातील या बँकेत खाते असेल तर तुम्हाला काढता येतील फक्त 1000 रु! हे आहे कारण
जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम राबवली
केंद्र सरकार जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवत आहे. ज्यामध्ये 110 कोटींहून अधिक लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. पुढील वर्षी 500 कोटींचे लसींच्या मात्रांचे उत्पादन केले जाईल आणि त्यापैकी 5 किंवा 6 लसी या भारतात निर्माण केल्या, ज्यात जगातील पहिली अनुनासिक लस (Nasal Vaccine) आणि पहिली डीएनए लस (DNA Vaccine) यांचा समावेश आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.