LUX, लाईफबॉयसारख्या साबणाच्या किंमती वाढणार, वाचा तुमचा आवडता साबण या यादीत आहे का?

LUX, लाईफबॉयसारख्या साबणाच्या किंमती वाढणार, वाचा तुमचा आवडता साबण या यादीत आहे का?

आता सर्वसामान्यांची आंघोळही महागणार, असे आहेत साबणांचे नवे दर

  • Share this:

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : एकीकडे केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2020) सादर केला जात आहे, तर यादरम्यान हिंदुस्तान युनिलिव्हरने सामान्य नागरिकांना एक मोठा धक्का दिला आहे. सामान्यांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या हिंदुस्तान युनिलिव्हरच्या  साबणांच्या किमतीमध्ये वाढ होणार आहे. लक्स (Lux), लाइफबॉय (Lifebuoy), डव्ह (Dove), पीअर्स (Pears), हमाम (Hamam), लीरिल (Liril) तसंच रेक्सोना (Rexona) हे साबण महाग होणार आहेत. साबणांच्या किमतीत 6 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय एचयूल (HUL) कडून घेण्यात आला आहे. रोजच्या वापरातील साबणच महागल्यामुळे सामान्यांच्या ठरलेल्या महिन्याच्या बजेटला धक्का बसणार आहे.

(हेही वाचा-Budget 2020: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मेगाप्लॅन, 16 कलमी कार्यक्रम)

एचयूलचे मुख्य आर्थिक अधिकारी श्रीनिवास पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 6 महिन्यात पाम तेलाच्या किमतीत 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परिणामी साबणाच्या किमतीत वाढ होणार आहे. टप्प्याटप्प्याने ही वाढ करण्यात येणार आहे.

(हेही वाचाबजेटआधीच सर्वसामान्यांना फटका! गॅस सिलिंडर 225 रुपयांनी महागले, असे आहेत नवे दर)

डिसेंबर 2019 मध्य संपलेल्या तिमाहीमध्ये एचयूलच्या नफ्यात 12.95 टक्के वाढ झाली. यावेळी त्यांना 1 हजार 631 कोटींचा नफा झाला होता. यादरम्यान एचयूलच्या प्रॉडक्ट्सची विक्री 3.87 टक्क्यांनी वाढून 9 हजार 953 कोटी झाली आहे.

पाम तेलाच्या किमतीत वाढ होण्याची कारणं

काश्मीरमधून 370 कलम हटवल्यानंतर आणि नागरिकत्त्व सुधारणा कायद्याविरोधात (CAA) भूमिका घेतल्यामुळे भारताने मलेशियातून आयात होणाऱ्या पाम तेलावर निर्बंध आणले. आपल्या देशात वर्षभरात साधारण 1.5 कोटी टन वनस्पती तेलाची आयात केली जाते. यामध्ये 90 लाख टन पाम तेलाचा समावेश आहे. मुख्यत: हे तेल मलेशिया आणि इंडोनेशियामधून आयात केलं जातं. एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात होणाऱ्या तेलावर निर्बंध आणल्यामुळे पाम तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे.

 

 

First published: February 1, 2020, 12:51 PM IST

ताज्या बातम्या