Home /News /money /

Petrol Diesel Prices : महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यात मिळतंय सर्वाधिक महाग पेट्रोल; आजही 1.50 रुपयांनी वाढला दर

Petrol Diesel Prices : महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यात मिळतंय सर्वाधिक महाग पेट्रोल; आजही 1.50 रुपयांनी वाढला दर

गुरुवारी कोणतीही वाढ न झाल्याने राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 105.41 रुपयांवर स्थिर आहेत. मात्र, स्थानिक करामुळे महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचा दर 1.50 रुपयांनी वाढून 123.53 रुपये प्रति लिटर झाला आहे

  नवी दिल्ली 07 एप्रिल : सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींपासून (Petrol Diesel Price Today) जनतेला दिलासा दिला आहे. अनेक दिवसांपासून सातत्याने वाढत असलेले भाव आज स्थिर असून त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. 22 मार्चपासून तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 14 वेळा वाढ केली आहे (Hike in Petrol Diesel Price). या काळात दोन्ही प्रकारचे इंधन सुमारे 10 रुपयांनी महागले आहे. यापूर्वी, 4 नोव्हेंबर 2021 नंतर, कंपन्यांनी सुमारे चार महिने त्यांच्या किमती वाढवल्या नाहीत. या काळात जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०० डॉलरच्या वर गेली आणि आता या दबावाची भरपाई करण्यासाठी कंपन्या सातत्याने किंमती वाढवत आहेत.

  Home Loan | गृहकर्ज घ्यायचे असेल तर आधी हे काम करा; नाहीतर ऐनवेळी होईल पंचाईत

  गुरुवारी कोणतीही वाढ न झाल्याने राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 105.41 रुपयांवर स्थिर आहेत. मात्र, स्थानिक करामुळे महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोलचा दर 1.50 रुपयांनी वाढून 123.53 रुपये प्रति लिटर झाला आहे. सध्या देशात विकलं जाणारं हे सर्वात महाग पेट्रोल आहे.
  चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर - दिल्ली पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर मुंबई पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर चेन्नई पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर कोलकाता पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर

  LIC IPO ची वाट पाहणाऱ्यासाठी मोठी अपडेट; सरकारकडून 'या' तारखेपर्यंत आयपीओ लॉन्च केला जाऊ शकतो

  पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.
  तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक आरएसपी ९२२४९९२२४९ या क्रमांकावर आणि बीपीसीएल ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP लिहून माहिती मिळवू शकतात. तर HPCL ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPprice पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Petrol and diesel price, Petrol Diesel hike

  पुढील बातम्या