नवी दिल्ली 02 एप्रिल : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात (Gold Price Today) सातत्यानं घसरण होत असल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र, आता लग्नसराई सुरू होण्याआधीच सोनं आणि चांदीच्या किमतीत (Gold and Silver Price) वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज म्हणजेच शुक्रवारी गूड रिटर्न्सच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, सोन्याच्या किमतीत 10 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी वाढ झाली आहे. तर, दुसरीकडे चांदीच्या किमतीत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. चांदीच्या किमतीत 1400 रुपये प्रति किलो इतकी वाढ झाली आहे. सध्या एका किलो चांदीचे भाव 65 हजार रुपयांवर गेले आहेत. भारतीय बाजारात गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या किमतीत आलेल्या घसरणीनंतर आज वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
सोन्याचे आजचे दर - शुक्रवारी 22 कॅरेट सोन्याचे दर 43,380 तर 24 कॅरेट सोन्याचे दर 44,380 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत.
चांदीचे नवे दर - चांदीच्या किमतीत शुक्रवारी मोठी वाढ नोंदवली गेली आहे. आज चांदीच्या किमतीत 00 रुपयांची वाढ झाली असून चांदी 65,000 रुपये प्रति किलोग्रावर पोहोचली आहे.
सोन्याच्या किमतीत येणार तेजी - जाणकारांच्या मते सोन्याच्या किमतीत झालेली घसरण जास्त काळासाठी नाही. डॉलरच्या किमतीतील कमकुवतपणा, वाढत्या महागाईचा दबाव आणि चलनवाढीचा थेट परिणाम सोन्याच्या भावावर झाला आहे.जगभरातील सद्यस्थिती पाहता तज्ञांनी सोन्याच्या दहा ग्रॅमचे भाव 52,000 ते 53,000 वर जातील असं म्हटलं आहे. त्याचबरोबर काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की सन 2021 मध्ये सोनं 63 हजार रुपयांची पातळीही ओलांडू शकेल. त्यामुळे, सोन्याच्या किमतीतील याआधीची घसरण तात्पुरत्या स्वरुपाची आहे, असं म्हणायला हरकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold and silver, Gold prices today, Silver prices today