Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी आज पुन्हा घेतली उसळी, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Price Today: पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी आज पुन्हा घेतली उसळी, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

IOCL च्या वेबसाईटनुसार, देशभरात पेट्रोलच्या दरात (Petrol Price Today) 26-27 पैसे प्रति लीटर तर डिझेलच्या दरात (Diesel Price Today) 29-31 पैसे प्रति लीटर वाढ झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 06 जून : एका दिवसाच्या घसरणीनंतर रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol-Diesel) किमतीत पुन्हा घट झाल्याचं पाहायला मिळालं. देशाच्या राजधानीसह सर्वच मोठ्या शहरांमध्ये किमतीत वाढ झाली आहे. IOCL च्या वेबसाईटनुसार, देशभरात पेट्रोलच्या दरात (Petrol Price Today) 26-27 पैसे प्रति लीटर तर डिझेलच्या दरात (Diesel Price Today) 29-31 पैसे प्रति लीटर वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये आज एक लीटर पेट्रोलचे दर 95.03 रुपये आणि डिझेलचे भाव 85.95 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत.

तुमच्या शहरातील एक लीटर पेट्रोलचे दर - (Petrol Price on 6th june 2021)

दिल्ली - 95.03 रुपये

मुंबई - 101.25 रुपये

कोलकाता - 95.02 रुपये

चेन्‍नई - 96.47 रुपये

जयपूर - 101.59 रुपये

बेंगळुरु - 98.20 रुपये

SIP मध्ये गुंतवणूक आता होणार आणखी सोपी, जाणून घ्या नवी प्रक्रिया

एक लीटर डिझेलचे दर -

दिल्ली - 85.95 रुपये

मुंबई - 93.30 रुपये

कोलकाता - 88.80 रुपये

चेन्‍नई - 90.66 रुपये

जयपूर - 94.81 रुपये

बेंगळुरु - 91.12 रुपये

अशाप्रकारे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS)च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता.

तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल. BPCL कस्टमर RSP लिहून 9223112222 या क्रमांकावर तर एचपीसीएल कस्टमर HPPrice लिहून 9222201122 या क्रमांकावर मेसेज पाठवून तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलची किंमत जाणून घेऊ शकतात.

Published by: Kiran Pharate
First published: June 6, 2021, 10:10 AM IST

ताज्या बातम्या