मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Gold Price Today: सोने दरात वाढ, तर चांदीचा भाव उतरला, पाहा लेटेस्ट गोल्ड रेट

Gold Price Today: सोने दरात वाढ, तर चांदीचा भाव उतरला, पाहा लेटेस्ट गोल्ड रेट

आंतरराष्ट्रीय बाजारातील संकेतांमुळे आज भारतात 31 मे 2021 रोजी सोने दरात (Gold Price Today) तेजी पाहायला मिळाली.

आंतरराष्ट्रीय बाजारातील संकेतांमुळे आज भारतात 31 मे 2021 रोजी सोने दरात (Gold Price Today) तेजी पाहायला मिळाली.

आंतरराष्ट्रीय बाजारातील संकेतांमुळे आज भारतात 31 मे 2021 रोजी सोने दरात (Gold Price Today) तेजी पाहायला मिळाली.

  • Published by:  Karishma
नवी दिल्ली, 31 मे: आंतरराष्ट्रीय बाजारातील संकेतांमुळे आज भारतात 31 मे 2021 रोजी सोने दरात (Gold Price Today) तेजी पाहायला मिळाली. त्यामुळे सोन्याचा भाव 48,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. आज चांदीचा दर (Silver Price Today) काहीसा कमी झाला आहे. गेल्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने दर 48,413 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदीचा भाव 70,536 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता. आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोने दरात तेजी पाहायला मिळाली, तर चांदीचा दर स्थिर होता. सोन्याचा नवा भाव (Gold Price, 31 May 2021) - दिल्ली सराफा बाजारात आठवड्याच्या सुरुवातीला आणि महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी सोने दरात 195 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढ झाली. त्यामुळे सोने दर 48,500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. राजधानी दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवा दर 48,608 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. याआधीच्या सत्रात सोन्याचा भाव 48,413 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. चांदीचा नवा दर (Silver Price, 31 May 2021) - चांदीचा दर आज काहीसा कमी झाला. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी चांदीचा भाव 15 रुपयांनी कमी झाला असून आता नवा दर 70,521 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. याआधीच्या सत्रात चांदीचा भाव 70,536 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता.

(वाचा - तुम्ही घेतलेलं सोनं असली की नकली? सरकारच्या या App द्वारे ओळखा)

सोने दरात वाढ का? एचडीएफसी सिक्योरिटीजचे सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्याने सोने दरात तेजी आली आहे. दुसरीकडे न्यूयॉर्कच्या कमॉडिटी एक्सचेंज कॉमेक्सवरही सोने दर तेजीत होता. याचाच परिणाम भारतीय बाजारातील किंमतीवर पाहायला मिळाला.
First published:

Tags: Gold, Gold and silver, Gold and silver prices today, Gold prices today

पुढील बातम्या