ग्लोबल मार्केट्समध्ये 2 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहचले आहेत. याचा परिणाम भारतीय बाजारातही पाहायला मिळतो आहे. भारतातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
नवी दिल्ली, 4 जानेवारी : सोने आणि चांदीचे भाव (Gold and Silver Prices) ग्लोबल मार्केट्समध्ये 2 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहचले आहेत. याचा परिणाम भारतीय बाजारातही पाहायला मिळतो आहे. भारतातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरी होणारं सोनं वायदा बाजारात आज 1.23 टक्के म्हणजेच 600 रुपयांच्या वाढीसह प्रति 10 ग्रॅम 50,826 रुपयांवर पोहचलं आहे. तर मार्चमध्ये डिलिव्हरी होणारी चांदी वायदा बाजारात 2.10 टक्के अर्थात 1430 रुपयांच्या वाढीसह 69,552 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे.
वायदा बाजारातील सोन्यासह देशात आज Spot Gold च्या किंमतीतही वाढ झाली आहे. भारतात आज Spot Gold प्रति 10 ग्रॅम 50,070 रुपयांच्या दराने ट्रेड करत आहे. ग्लोबल मार्केटमध्येही Spot Gold च्या किंमतीमध्ये वाढ झाली असून किंमती दोन महिन्यांच्या उच्चांकी स्तरांवर पोहचल्या आहेत.
रुपयाच्या तुलनेत डॉलर घसरला असल्याने त्याचा सोन्या-चांदीच्या दरावर परिणाम झाला आहे. तसंच जगभरात कोरोना व्हायरस रुग्णांमध्येही वाढ होत असल्याने सोन्या-चांदीचे भाव वाढले आहेत. तसंच अमेरिकेत मोठ्या मदत पॅकेजच्या चर्चेमुळेही मौल्यवान धातूच्या किंमतीवर परिणाम झाला आहे.
Published by:Karishma
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.