नवी दिल्ली 10 मे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही सोनं (Gold Price Today) आणि चांदीच्या किमतीत तेजी आल्याचं पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) आज सोन्याच्या दरात तेजी आल्याचं चित्र आहे. सोन्याचा जूनचा वायदा 58.00 रुपयांच्या तेजीसह 47,809.00 रुपयांच्या लेवलवर आहे. तर, चांदीचा जुलैचा वायदा 720.00 रुपयांच्या तेजीसह 72,149.00 रुपयांवर ट्रेंड करत आहे. मात्र, सतत तेजी येत असतानाही सोन्याची दर आपल्या सर्वोच्च स्तराच्या (All-Time High) 9,015 रुपयांनी खालीच आहेत.
याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचं झाल्यास, इथेही सोन्याची किमतीत तेजीचं चित्र पाहायला मिळत आहे.
चोवीस कॅरेट सोन्याची किंमत -
24 कॅरेट सोन्याच्या भावाबद्दल बोलायचं झाल्यास, आज दिल्लीमध्ये याची किंमत 50000 प्रति दहा ग्रॅम इतकी आहे. याशिवाय चैन्नईमध्ये 49220 रुपये, कोलकाता 49670 आणि मुंबईमध्ये 45920 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
९ हजारानं झालं स्वस्त -
सोन्याचे भाव ऑगस्ट 2020 च्या पहिल्या आठवड्यात आतापर्यंतच्या उच्चांकावर होते. सात ऑगस्टला सोन्याचे भाव 56,200 रुपये प्रति १० ग्रॅम होते. 7 मे 2021 ला म्हणजेच शुक्रवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे बाजार 47,760 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले. या आधारे सोन्याचे दर ऑगस्टमधील उच्चांकाच्या 9,015 रुपये प्रति दहा ग्रॅम कमी आहे.
अशी तपासा सोन्याची शुद्धता -
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी सरकारकडून एक अॅप बनवलं गेलं आहे. 'BIS Care app' या अॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची आणि चांदीची शुद्धता तपासू शकतात. या अॅपच्या माध्यमातून केवळ शुद्धता तपासता येत नाही तर याबाबतची कोणतीही तक्रारही आपण करू शकता. या अॅपच्या माध्यमातून तक्रार केल्यास ग्राहकाला तात्काळ त्याबद्दलची सर्व माहितीही मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gold and silver, Gold prices today