मराठी बातम्या /बातम्या /मनी /Gold Price Today: सोन्याच्या दरात तेजी तर चांदीचे भावही वधारले, तपासा लेटेस्ट रेट

Gold Price Today: सोन्याच्या दरात तेजी तर चांदीचे भावही वधारले, तपासा लेटेस्ट रेट

सोनं आणि चांदीच्या (Gold-Silver) किमतींमध्ये आज तेजी आल्याचं पाहायला मिळालं.मागील वर्षीदेखील याच काळात सोन्याच्या किमतींमध्ये 0.5 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती.

सोनं आणि चांदीच्या (Gold-Silver) किमतींमध्ये आज तेजी आल्याचं पाहायला मिळालं.मागील वर्षीदेखील याच काळात सोन्याच्या किमतींमध्ये 0.5 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती.

सोनं आणि चांदीच्या (Gold-Silver) किमतींमध्ये आज तेजी आल्याचं पाहायला मिळालं.मागील वर्षीदेखील याच काळात सोन्याच्या किमतींमध्ये 0.5 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती.

नवी दिल्ली 17 मे : सोनं आणि चांदीच्या (Gold-Silver) किमतींमध्ये आज तेजी आल्याचं पाहायला मिळालं. एमसीएक्सवर सोन्याचा वायदा (Gold price today) 0.7 टक्क्यांनी वाढून 48,003 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला. तर, चांदीच्या दरात 1.2 टक्क्यांची मोठी वाढ आली असून दर 71,940 प्रति किलोग्रॅमवर पोहोचले. यंदा अक्षय्य तृतीयेलाही सोन्याच्या खरेदीवर कोरोनाचा प्रभाव दिसला. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी अक्षय्य तृतीयेला कोरोनाच्या आधीच्या म्हणजेच 2019 च्या तुलनेत केवळ 10 टक्केच विक्री झाली आहे. यासोबतच स्थानिक लॉकडाऊनचाही मोठा परिणाम पाहायला मिळाला आहे.

मागील वर्षीदेखील याच काळात सोन्याच्या किमतींमध्ये 0.5 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. तर, चांदीच्या किमतींमध्येही 0.9 टक्क्यांची तेजी होती. जागतिक बाजाराबाबत बोलायचं झाल्यास अमेरिकी डॉलर आणि ट्रेजरी यील्डमध्ये घसरण झाल्यानं सोन्याच्या किमती तीन महिन्याच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. इथे सोन्याचे सध्याचे भाव 0.6 टक्क्यांनी वाढून 1,852.39 डॉलरवर पोहोचले आहेत.

24 कॅरेट सोन्याचे भाव -

24 कॅरेट सोन्याच्या भावाबाबत बोलायचं झाल्यास आज दिल्लीमध्ये 10 ग्रॅमची किंमत 50220 इतकी आहे. चेन्नईमध्ये 49660, कोलकाता 49930 रुपये आणि मुंबईमध्ये 46080 इतकी आहे.

आर्थिक वर्ष 2021-22 साठीची सॉवरेन गोल्ड बॉन्डची (Sovereign gold bond) पहिली विक्री 17 मे म्हणजेच सोमवारपासून सुरू झाली आहे. ही विक्री पाच दिवस चालेल. म्हणजेच तुमच्याकडे पाच दिवस बाजारातील किमतीपेक्षा स्वस्तात सोनं खरेदी करण्याची संधी आहे.

वित्त मंत्रालयानं (Finance Ministry)सांगितलं, की सॉवरेन गोल्ड बॉन्ड मे ते सप्टेंबरच्या दरम्यान सहा हप्त्यांमध्ये जारी केले जातील. रिजर्व बँकेनं (RBI) यासाठी 4,777 रुपये प्रति ग्रॅमचा भाव निश्चित केला आहे. जे लोक यासाठी ऑनलाईन अर्ज करतील आणि डिजीटल पेमेंट करतील त्यांना प्रति ग्रॅम पन्नास रुपयांचा डिस्काऊंट मिळेल.

First published:

Tags: Gold and silver, Gold and silver prices today, Gold bond