Gold Price Today: सोने-चांदी दरात वाढीचं सत्र सुरुच; पाहा आजचा लेटेस्ट गोल्ड रेट

Gold Price Today: सोने-चांदी दरात वाढीचं सत्र सुरुच; पाहा आजचा लेटेस्ट गोल्ड रेट

2020 मधील सर्वोच्च स्तरावरुन सोने दर 9000 रुपयांच्या जवळपास कमी झाला आहे. त्यामुळे जर सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर आता चांगली संधी असल्याचं सांगितलं जात आहे. 2021 च्या अखेरीस नफा कमावण्याची चांगली संधी मिळू शकते, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 मे : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव (Gold Price Today) वधारल्याने भारतीय बाजारात आज 10 मे 2021 रोजी सोने-चांदी दरात वाढ झाली आहे. तर चांदीच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने दर 47,273 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. तर चांदीचा दर (Silver Price Today) 70,715 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने दरात वाढ झाली असून चांदीचा भाव स्थिर आहे.

सोन्याचा नवा दर (Gold Price, 10 May 2021) -

दिल्ली सराफा बाजारात आठवड्याच्या सुरुवातीलाच सोमवारी सोन्याचा भाव 179 रुपये प्रति 10 ग्रॅमने वधारला. दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा नवा दर 47,452 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. याआधीच्या सत्रात सोन्याचा दर 47,273 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

2020 मधील सर्वोच्च स्तरावरुन सोने दर 9000 रुपयांच्या जवळपास कमी झाला आहे. त्यामुळे जर सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर आता चांगली संधी असल्याचं सांगितलं जात आहे. 2021 च्या अखेरीस नफा कमावण्याची चांगली संधी मिळू शकते, असं जाणकारांचं म्हणणं आहे.

चांदीचा नवा दर (Silver Price, 10 May 2021) -

चांदीचा दरही वधारला आहे. दिल्ली सराफा बाजारात सोमवारी चांदीचा भाव 826 रुपयांनी वाढून 71 हजार रुपये प्रतिकिलो ग्रॅमवर पोहोचला आहे. आज चांदीचा दर 71,541 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. याआधीच्या सत्रात चांदीचा भाव 70,715 रुपये प्रति किलोग्रॅम इतका होता.

(वाचा - LICग्राहकांसाठी मोठी बातमी;आजपासून नवा नियम लागू,वाचा तुमच्यावर काय होणार परिणाम)

सोने दरात तेजी -

एचडीएफसी सिक्योरिटीजचे सिनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर चलनाच्या तुलनेत डॉलर कमकुवत झाल्याने गोल्ड रेटमध्ये तेजी आहे. अमेरिकी बाँड यील्डमध्येही घसरण झाल्याने याचा परिणाम सोने दरावर झाला आहे. न्यूयॉर्कच्या कमॉडिटी एक्सचेंजवरवर सोने दरात वाढ झाली. भारतीय बाजारावरही याचा परिणाम झाल्याने, सोने दरात वाढ झाली आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: May 10, 2021, 6:25 PM IST

ताज्या बातम्या