Home /News /money /

कोरोनामध्ये अर्थसंकट? मुंबई ते दिल्लीपर्यंत महागड्या 10 प्रॉपर्टी डील; 1 बंगला तर 170 कोटींना केला खरेदी

कोरोनामध्ये अर्थसंकट? मुंबई ते दिल्लीपर्यंत महागड्या 10 प्रॉपर्टी डील; 1 बंगला तर 170 कोटींना केला खरेदी

मुंबई किंवा देशभरातील प्रशस्त ठिकाणी सी-फेसिंग अपार्टमेंट, अलिशान बंगला, खाजगी लिफ्ट असलेले अल्ट्रा लक्झरी घर खरेदी करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते.

मुंबई, 24 फेब्रुवारी :  मुंबई किंवा देशभरातील प्रशस्त ठिकाणी सी-फेसिंग अपार्टमेंट (Sea-facing apartments), अलिशान बंगला (bungalows), खाजगी लिफ्ट असलेले अल्ट्रा लक्झरी घर खरेदी करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मोठमोठे उद्योजक, सेलिब्रिटी अशा प्रकारची घरं खरेदी करत असतात. सरकारने मुद्रांक शुल्क म्हणजेच स्टॅम्प ड्युटी कमी केल्यामुळे घर खरेदीकडे लोकांचा कल वाढला आहे. एकीकडे कोरोनाच्या काळामध्ये सर्वांना आर्थिक फटका बसलेला असताना सुद्धा देशामध्ये 10 मोठ्या प्रॉपर्टी डील झाल्या आहेत. मनी कंट्रोल या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार हे अलिशान अपार्टमेंट आणि बंगलो कोणी, कितीला आणि कुठे खरेदी केले आहेत यावर आज आपण उलटगणती पद्धतीने नजर टाकणार आहोत. 10 - 27 जानेवारी 2021 रोजी अल्टामाऊंट रोडवर असलेल्या वन अल्टामाऊंट इमारतीच्या 12 व्या मजल्यावरील अपार्टमेंट भाड्याने देण्यात आले आहे. या अपार्टमेंटचे महिन्याचे भाडे 25 लाख रुपये एवढे आहे. रिषभ रमेश गोवानी यांनी हे अपार्टमेंट विनोद कुमार मित्तल यांना 36 महिन्यांसाठी भाड्याने दिले आहे. या अपार्टमेंटची किंमत 60 कोटी रुपये आहे. (Source: Unsplash) 9 - महिनाभरापूर्वी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने (Hrithik Roshan) मुंबईतल्या जुहू-वर्सोवा लिंक रोडवर 100 कोटी रुपयांचे दोन अपार्टमेंट खरेदी केले. हे अपार्टमेंट तीन मजल्यांचे आहेत. या अपार्टमेंटमध्ये खासगी लिफ्ट आणि 10 पार्किंग स्लॉट आहेत. (photo : Twitter @iHrithik) 8 - मुंबई भारताच्या एन्टरटेन्मेंट इंडस्ट्रीचे केंद्र आहे. मुंबईमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी राहतात. या सेलिब्रिटींपैकी एक असलेली अभिनेत्री आलिया भटने (Alia Bhatt) नोव्हेंबरमध्ये वांद्रे पाली हिल येथील वास्तू इमारतीमध्ये 32 कोटी रुपयांना घर खरेदी केले. आलियाचे हे नवीन अपार्टमेंट 2,460 स्क्वेअर फुटांचे आहे. आलियाने ज्या इमारतीमध्ये घर खरेदी केले आहे त्यामध्ये सातव्या मजल्यावर तिचा बॉयफ्रेंड अभिनेता रणबीर कपूर राहतो. 7 - एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) केकी मिस्त्री (Keki Mistry) यांनी वरळीतील आर्टेसियामध्ये अल्ट्रा लक्झरी अपार्टमेंट खरेदी केले आहे. त्यांच्या या घराची किंमत 41.23 कोटी रुपये एवढी आहे. या अपार्टमेंटमधून अरबी समुद्र आणि वरळी सी-लिंक दिसतो. 18 नोव्हेंबरला त्यांनी हे अपार्टमेंट खरेदी केले असून ते 35 व्या मजल्यावर आहे. त्यांचे हे अलिशान अपार्टमेंट 7,390 स्क्वेअर फुटांचे आहे. 6 - एचडीएफसी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आदित्य पुरी (Aditya Puri) यांची मुलगी अमृता पुरी आणि पत्नी अनिता यांनी दक्षिण मुंबईत घर खरेदी केले आहे. 25 नोव्हेंबरला त्यांनी मलबार हिल परिसरामध्ये एक उबर-लक्झरी सी फेसिंग घर 50 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. वाळकेश्वरमधील राजभवनाजवळ लोढा सीमोंटमध्ये असलेले त्यांचे हे घर 19 व्या मजल्यावर आहे आणि यामध्ये सात कार पार्किंगची जागा आहे. 5 - मोतीलाल ओसवाल फॅमिली ट्रस्टने (Motilal Oswal Family Trust ) दक्षिण मुंबईत 6,800 स्क्वेअर फुटांचे दोन आलिशान डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केले आहे. या अपार्टमेंटची किंमत 101 कोटी रुपये एवढी आहे. 22 डिसेंबर 2020 रोजी याची नोंद झाली. 4 - भारत सीरम्स आणि व्हॅक्सिन्सचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. गौतम दफ्तरी (Bharat Serum & Vaccines’ Gautam Daftary ) यांनी डिसेंबर 2020 मध्ये दक्षिण मुंबईत दोन सी फेसिंग अपार्टमेंट खरेदी केले. 20 व्या मजल्यावर असलेल्या या अपार्टमेंटची किंमत 101 कोटी रुपये एवढी आहे. हे अपार्टमेंट 6,366 स्क्वेअर फुटांचे आहे. (Photo : bharatserums.com) 3 - व्हर्चो लॅबोरेटरीज लिमिटेडचे मालक एन. वेंकटा रेड्डी (N Venkata Reddy) यांनी अलिशान घर खरेदी केले आहे. देशातील सर्वात महागड्या व्यावसायिक आणि निवासी क्षेत्रात त्यांनी हे नवीन घर खरेदी केले आहे. हैदराबादच्या पॉश ज्युबिली हिल्स उपनगरात त्यांचे हे घर असून त्याची किंमत 41.3 कोटी एवढी आहे. 28 जानेवारी 2021ला या घराची नोंद करण्यात आली आहे. हे घर 1,837 स्क्वेअर यार्ड क्षेत्राच्या भूखंडावर वसलेले आहे. (Photo: Facebook) (हे पहा :  सावधान! क्रेडिट कार्डच्या व्यवहारांमध्ये अँड्रॉइड app ठरतंय धोकादायक   ) 2 - कॉस्मो फिल्मसचे संस्थापक अशोक जयपुरीया (Ashok Jaipuria ) यांनी दक्षिण दिल्लीत अलिशान बंगला खरेदी केला आहे.  80 कोटी रुपयांना त्यांनी हा बंगला खरेदी केला असून जानेवारी 2021 मध्ये हा करार झाला आहे. (Photo: Twitter @CosmoFilmsLtd) 1 - डिक्सन टेक्नॉलॉजीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुनील वाचानी ( Sunil Vachani) यांनी नवी दिल्लीतील टोनी लुटियन्स बंगलो झोनमध्ये नवीन घर खरेदी केले आहे. त्यांनी हा बंगला 170 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. गोल्फ लिंक्स येथे त्यांचा हा बंगला असून 1,250 स्क्वेअर यार्डवर वसलेला आहे. लॉकडाऊननंतर राजधानी दिल्लीतील ही सर्वात मोठी डील असल्याचे म्हटले जात आहे.  (photo: Twitter @SunilVachani)
Published by:Aiman Desai
First published:

Tags: Business News

पुढील बातम्या