• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • Hero Cycles देखील IPO आणण्याच्या तयारीत? काय आहे कंपनीचा एक्सटेन्शन प्लान

Hero Cycles देखील IPO आणण्याच्या तयारीत? काय आहे कंपनीचा एक्सटेन्शन प्लान

Hero Motors Company ला युरोपियन बाजारपेठेत प्रवेश करायचा आहे. हिरो सायकल्स युरोपियन बाजारातील टॉप पाच सायकल उत्पादक कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.

 • Share this:
  मुंबई, 25 ऑक्टोबर : गेल्या काही वर्षात सायकल निर्मिती व्यवसायात भरभराट आली आहे. सायकलची मागणी वाढत असल्याने त्याचे उत्पादनही वाढू लागले आहे. त्यामुळे सायकल निर्मिती करणाऱ्या कंपन्या सध्या तेजीत आहेत. हिरो सायकल्स या जगातील सर्वात मोठ्या सायकल उत्पादक कंपनीने पुढील दोन वर्षांसाठी आपल्या व्यवसाय विस्ताराची योजना तयार केली आहे. या विस्तार योजनांमध्ये हिरो सायकल समूह कंपन्यांमध्ये शेअर विक्री, इतर कंपन्यांचे अधिग्रहण आणि IPO यांचा समावेश आहे. पंकज मुंजाल (Pankaj Munjal) यांच्या नेतृत्वाखाली हिरो सायकल्स ही कंपनी HMC (Hero Motors Company) हिरो मोटर्स कंपनीचा भाग आहे. पंकज मुंजाल यांच्या नेतृत्वात ही कंपनी सुरु आहे. आता कंपनी आपला जागतिक स्तरावर विस्तार करण्याचा विचार करत आहे. कंपनीला युरोपियन बाजारपेठेत प्रवेश करायचा आहे. हिरो सायकल्स युरोपियन बाजारातील टॉप पाच सायकल उत्पादक कंपन्यांमध्ये स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी कंपनी भारताबाहेरील दोन कंपन्यांच्या खरेदीला अंतिम स्वरूप देण्याच्या प्रक्रियेत आहे. हिरो सायकल्सचे प्रमुख पंकज मुंजाल यांनी Money Control ला सांगितले की, जपान आणि युरोपमधील दोन मोठ्या कंपन्यांशी करार करत आहेत. मात्र या डीलबाबत नंतर खुलासा केला जाईल. एकदा या दोन कंपन्या अधिग्रहित केल्यानंतर हिरो सायकल्स ग्रुप आपल्या संस्थांमधील शेअर विक्रीद्वारे 200 मिलियन डॉलर उभारण्याची प्रक्रिया सुरू करेल. इंधन दरवाढीचं टेन्शन का घ्यायचं? 71 लीटर पेट्रोल-डिझेल फ्री मिळवा, कसं? पंकज मुंजाल पुढे म्हणाले की, सध्या हिरो सायकल्सच्या उलाढालीपैकी 50 टक्के उलाढाल भारताबाहेरून येते. त्यांच्या कंपनीने वर्षानुवर्षे हिरो इंटरनॅशनलद्वारे युरोपमध्ये आपली उपस्थिती मजबूत केली आहे. 2015 मध्ये, हिरोने मँचेस्टरस्थित (Manchester) इनसिंक बाईक्स ( Insync Bikes) विकत घेतली. यानंतर, कंपनीने 2020 मध्ये जर्मन ई-बाइक उत्पादक एचएनएफ निकोलईचे (HNF Nicolai) अधिग्रहण केले. Hero Cycles ने HNF Nicolai मध्ये 48 टक्के स्टेक विकत घेतले. Petrol-Diesel Price: पेट्रोल 23.88 रुपये, तर डिझेल 22.21 रुपयांनी महागलं, 20 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं IPO आणण्याची योजना आतापर्यंत हिरो ब्रँडमध्ये पंकज मुंजाल यांचे चुलत भाऊ पवन मुंजाल यांची कंपनी हिरो मोटोकॉर्प स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेड आहे. Hero MotoCorp ही देशातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी आहे. हिरो सायकल्सच्या IPO च्या प्रश्नावर, पंकज मुंजाल म्हणाले की याबद्दल अद्याप कोणतीही टाईमलाईन सांगता येणार नाही, परंतु 2024 पर्यंत याबाबत बरेच काही घडू शकते. तसेच हिरो सायकल्स पब्लिक कंपनी बनवण्याचा विचार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
  Published by:Pravin Wakchoure
  First published: