चांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे? भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय, सरकारकडूनही मिळेल आर्थिक मदत

चांगली कमाई करून देणारा बिझनेस करायचं मनात आहे? भरघोस कमाईचे हे आहेत 5 व्यवसाय, सरकारकडूनही मिळेल आर्थिक मदत

यासाठी कसल्याही विशेष प्रशिक्षणाची गरज नाही. तसंच या सर्व व्यवसायांसाठी सरकारकडून आर्थिक मदतही दिली जाते.

  • Share this:

नवी दिल्ली, 20जानेवारी: चांगली कमाई करून देणारा एखादा व्यवसाय (Business) करण्याचा तुम्ही विचार करत असाल, तर तुम्हाला अशा 5 व्यवसायांबद्दल माहिती देत आहोत, ज्यामध्ये तुम्ही भरघोस कमाई करू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी कसल्याही विशेष प्रशिक्षणाची गरज नाही. तसंच या सर्व व्यवसायांसाठी सरकारकडून आर्थिक मदतही दिली जाते.

1) दुग्ध व्यवसाय :

दुग्ध व्यवसायाचा यात पहिला क्रमांक लागतो. याकरता 30 हजारांपर्यंत चांगली गाय (COW) आणि 50 ते 60 हजारांना चांगली म्हैस (Buffalo)  मिळू शकते. एक किंवा दोन गायी म्हशी घेऊन तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. हा व्यवसाय म्हणजे सोनं आहे, हे लक्षात ठेवा. दुध विक्रीसाठी तुम्ही कंपन्यांशी किंवा स्थानिक पातळीवरही दूध विक्रेत्यांशी संपर्क साधू शकता.

2)फुलशेती:

फुलांना (Flowers) नेहमीच मागणी असते. करारावर थोडीशी जमीन घेऊन आपण कोठेही फुलांची लागवड करू शकता. ऑनलाइन वेबसाइटवर संपर्क साधून आपण आपली फुले थेट विकू शकता. सूर्यफूल, गुलाब, झेंडू या फुलांची  लागवड अतिशय फायदेशीर ठरते.

3) झाडांमधूनही कमाई :

आपल्याकडं थोडी जमीन असेल तर  सागवान, रोझवूड अशी मौल्यवान झाडे (Trees) लावू शकता. 8-10 वर्षांनंतर ही झाडं तुम्हाला लक्षाधीश बनवू शकतात. रोझवूडचे एक झाड 40 हजार रुपये किंमतीला विकले जाते. सागवान तर त्यापेक्षाही अधिक किमती आहे.

4) मध व्यवसाय :

मध (Honey) काढण्यासाठी मधमाश्या पाळण्याचा व्यवसाय खूप जुना आहे; परंतु काळाबरोबर आता यात अधिक व्यावसायिकता आली आहे. एक ते दीड लाखांची गुंतवणूक करून आपण हा व्यवसाय सुरू करू शकता, मात्र यासाठी थोडे प्रशिक्षण आवश्यक आहे. या व्यवसायातून तुम्हाला चांगला नफा मिळेल, हे निश्चित.

हे देखील वाचा -  'मिशन हनी' : या महिलेने मधाचं उत्पादन करून मिळवले साडेचार लाख

5) भाजीपाला शेती करा

पारंपरिक पद्धतीची  गहू, ज्वारी, भात यांची शेती करणं हे प्रत्येकाच्या आवाक्यातील काम नाही. मात्र लहानशा जमिनीच्या तुकड्यावर भाज्यांची (Vegetables) लागवड केल्यास यातूनही आपल्याला भरभक्कम उत्पन्न मिळू शकते. हरियाणातील घरौंदा इथं असं एक केंद्र उभारण्यात आलं आहे. मिरची, कोबी,  टोमॅटो यासारख्या भाज्या चांगलं उत्पन्न देतात. त्यामुळे अगदी कमी खर्चात तुम्हाला भरपूर कमाई होईल. भाजी लागवडीचा हा व्यवसाय तुमचा खिसा भरून टाकेल, हे नक्की.

Published by: Aditya Thube
First published: January 20, 2021, 11:32 AM IST

ताज्या बातम्या