पूरग्रस्तांना मदत करताना हे केलं नाहीत तर बँक खातं होईल रिकामं, SBI ने दिला इशारा

पूरग्रस्तांना मदत करताना हे केलं नाहीत तर बँक खातं होईल रिकामं, SBI ने दिला इशारा

पूरग्रस्तांना मदत करायची तुमची इच्छा असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. पण अशी मदत करताना योग्य ती खबरदारीही घ्यायला हवी, असा इशारा SBI ने दिला आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : देशातल्या बहुतांश राज्यांमध्ये पुराची समस्या आहे. पुरामुळे शेकडो मृत्यू झाले तर कोट्यवधींच्या संपत्तीचं नुकसान झालं. या पूरग्रस्तांना मदत करायची तुमची इच्छा असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. पण अशी मदत करताना योग्य ती खबरदारीही घ्यायला हवी. भारतीय स्टेट बँकेने याबदद्ल एक इशारा दिला आहे. मदत करताना सावधगिरी बाळगली नाही तर बँक खातं रिकामं होण्याचा धोका आहे. त्यामुळे भावनेच्या भरात कुठलीही लिंक क्लिक करून तुमची गुप्त माहिती देऊ नका, असं SBI च्या अलर्टमध्ये म्हटलं आहे. पेमेंट करताना पेमेंट अ‍ॅड्रेस अधिकृत आहे की नाही याची पडताळणी करणं गरजेचं आहे. ज्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे आहेत त्याचीही योग्य माहिती घेणं गरजेचं आहे.

अशी घ्या खबरदारी

1. कोणत्याही ई मेलवरून आलेल्या लिंकला क्लिक करू नका.

2. पॉप अप विंडोच्या रूपात आलेल्या कोणत्याही पेजवर आपली माहिती भरू नका.

3. फोन किंवा ई मेलवरून तुमच्याशी कुणी संपर्क साधला तर त्याला पासवर्ड देऊ नका.

4. अ‍ॅड्रेस बारमध्ये योग्य URL टाइप करून साइटवर लॉग ऑन करा.

5. बँक कधीही तुमच्या खात्याबदद्ल माहिती घेण्यासाठी ई मेल करणार नाही हे ध्यानात ठेवा.

पूरग्रस्तांच्या मदतीच्या नावाखाली तुमच्या अकाउंटबदद्ल माहिती घेऊन अकाउंटमधून पैसे काढून घेतले जाण्याचा धोका आहे. त्यामुळे मदत करायची असेल तर ती अधिकृत संस्था किंवा सरकारी यंत्रणांच्या माध्यमातूनच करा, असंही आवाहन SBI ने केलं आहे.

सामान्यांसाठी मोठी बातमी, मोदी सरकार माफ करणार कर्ज

=================================================================================================

बिबट्याचा जवळून फोटो काढायला गेला अन्... पाहा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Floodmoney
First Published: Aug 19, 2019 06:51 PM IST

ताज्या बातम्या