मराठी बातम्या /बातम्या /मनी /15 वर्षे नोकरीला मारली दांडी; तरीही खात्यात जमा झाला 5 कोटी रुपये पगार

15 वर्षे नोकरीला मारली दांडी; तरीही खात्यात जमा झाला 5 कोटी रुपये पगार

पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणलं तेव्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनाही धक्काच बसला. रुग्णालयाची अशी फसवणूक करणाऱ्या या व्यक्तीचं वय आता 67 वर्षे असून, त्याची ओळख उघड करण्यास मात्र पोलीसांनी नकार दिला आहे.

  मुंबई, 25 एप्रिल : कोणतीही नोकरदार व्यक्तीला न कळवता दीर्घ काळ रजेवर राहिल्यास तिची नोकरीही जाऊ शकते. जगभरात सगळीकडे साधारण हेच नियम आहेत. प्रत्येक नोकरदार व्यक्तीला त्याची माहिती असते. इटलीत (Italy)मात्र एका रुग्णालयातील (Hospital) अजब प्रकरण उघड झालं आहे. इटलीतील एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं तब्बल 15 वर्षे कामावर गैरहजर राहूनही तब्बल 5 कोटी रुपये पगार घेतला आहे. विशेष म्हणजे याबाबत व्यवस्थापनाला इतक्या वर्षात या गैरप्रकाराबद्दल काहीही खबर लागली नाही. अलीकडेच दुसऱ्याच एका प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या ही बाब लक्षात आली आणि 15 वर्षांनंतर या माणसाचं बिंग फुटलं.

  (वाचा-नोरा फतेहीने या हॉलिवूड अभिनेत्रीला केलं कॉपी;Same to Same ड्रेसचे PHOTO व्हायरल)

  कामावर गैरहजर राहण्याबाबत या कर्मचाऱ्यानं कोणतीही नोटीस दिली नव्हती की अर्ज केला नव्हता. तरीही तो 2005 पासून आतापर्यंत बिनधास्त 15 वर्षे कामावर गैरहजर (Absent on Work) राहिला आणि वर त्या काळात पगारही (Salary) घेत राहिला. दर महिन्याला पगाराच्या दिवशी, त्याच्या खात्यात पैसे जमा होत असत. 15 वर्षात या व्यक्तीला तब्बल 5.38 लाख युरो म्हणजे सुमारे 4.8 कोटी रुपये पगार मिळाला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील नोकरीत इतकी प्रदीर्घ रजा आणि पगार मिळवण्याचा विक्रम या व्यक्तीनं नोंदवला असून, त्याला आता गैरहजर राहणाऱ्या लोकांचा बादशहा म्हणून ओळखलं जात आहे. दैनिक भास्करने हे वृत्त दिलं आहे.

  (वाचा-IPL 2021 : मुंबईच्या टीममध्ये असूनही अर्जुन तेंडुलकर डग आऊटमध्ये का दिसत नाही?)

  पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणलं तेव्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनाही धक्काच बसला. रुग्णालयाची अशी फसवणूक करणाऱ्या या व्यक्तीचं वय आता 67 वर्षे असून, त्याची ओळख उघड करण्यास मात्र पोलीसांनी नकार दिला आहे.

  या व्यक्तीवर आता फसवणूक, खंडणी आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप ठेवण्यात आला असून, त्याच्याबरोबर रुग्णालयाच्या सहा व्यवस्थापकांवरही कारवाई करण्यात येत आहे. ही व्यक्ती कामावर गैरहजर राहिल्यानंतरही या लोकांनी कोणतीही कारवाई केली नाही. या व्यक्तीनं तिच्याविरूद्ध शिस्तभंगाचा अहवाल दाखल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यवस्थापिकेला धमकावल्याची माहितीही पोलिस तपासात उघड झाली आहे. नंतर ही व्यवस्थापिका सेवानिवृत्त झाली आणि या कर्मचाऱ्यानं गैरहजर राहण्यास सुरुवात केली. फसवणूक आणि गैरहजर राहिल्याच्या आणखी एका प्रकरणाचा पोलिस तपास करत असताना हे प्रकरण उघडकीस आले.

  एचआर आणि व्यवस्थापक यांनाही खबरबात नाही

  एचआर विभाग आणि नवीन व्यवस्थापक यांना याबाबत कधीही काही कळले नाही, असं पोलिसांनी सांगितलं. कोणीही हा कर्मचारी कामावर का येत नाही, हे जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यामुळे कामावर गैरहजर असूनही दर महिन्याला त्याला पगार मिळत राहिला. या प्रकरणात रूग्णालयातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात असल्याचा पोलिसांना संशय असून, त्यादृष्टीनं ते सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

  First published:

  Tags: Job, Viral