म्हणूनच बदामाचे तेल हमदर्द रोगन बदाम शिरीन आपल्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी आवश्यक आहे

म्हणूनच बदामाचे तेल हमदर्द रोगन बदाम शिरीन आपल्या आरोग्य आणि सौंदर्यासाठी आवश्यक आहे

खोलपर्यंत ओलावा निर्माण करून हे हलके व चिकटपणा नसलेले बदामाचे तेल थंड व कोरड्या हिवाळी हवामानाशी दोन हात करते आणि त्वचा मुलायम आणि कोमल बनवते.

  • Share this:

अनेक दशकांपासून आपल्या माता बदामाचे फायदे जाणतात. खरं तर आपल्याला सर्वांनाच आपल्या आई किंवा आजीने रात्रभर बदाम भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी ते सोलून आपल्याला दिल्याचे आठवत असेल.

आजकाल आपली त्वचा, केस आणि एकूण आरोग्य सतत तणावाखाली असते. आपल्याला थकवा येतो, केस खराब होतात आणि त्वाचाही फिकी पडते. तरीही आपण नेहमी सुंदरच दिसावं अशी आपली अपेक्षा असते. जर आम्ही आपल्याला एका बहुगुणी उत्पादनाच्या मदतीने आपण तरुण व चमकदार त्वचा मिळवू शकाल आणि आपल्या आरोग्यामध्येही सुधारणा होईल असे सांगितले तर...

रोगन बदाम शिरीन हे हमदर्दमधील 100% शुद्ध, गोड बदामाचे एक अनोखे मिश्रण आहे. एक उच्च दर्जाचे तेल म्हणून हे आपल्याला ई जीवनसत्त्व, ए जीवनसत्त्व, झिंक, आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स पुरवते. हे एकच उत्पादन मेंदू आणि हाडांना बळकटी देते, थकवा दूर करते, शांत झोपेसाठी मदत करते तसेच ताकदही वाढवते. याखेरीज आपण याचा त्वचेची निगा, केसांची निगा आणि स्वयंपाक यांमध्ये विविध प्रकारे उपयोग करू शकता, हे वापरासाठी सुलभ आणि सौम्य आहे.

आपल्या त्वचा व नखांचे सौंदर्य व निगा

खोलपर्यंत ओलावा निर्माण करून हे हलके व चिकटपणा नसलेले बदामाचे तेल थंड व कोरड्या हिवाळी हवामानाशी दोन हात करते आणि त्वचा मुलायम आणि कोमल बनवते. आपल्या चेहरा व शरीरासाठी याचा वापर एक प्राथमिक मॉईश्चरायझर म्हणून किंवा एखाद्या मसाजसाठीच्या तेलासारखा करू शकता. तसेच हे तेल रोज लावल्याने कोपर, टाचा किंवा गुडघे यांसारख्या अधिक कोरड्या पडणाऱ्या भागांवर जास्त परिणाम दिसून येतो. रोगन बदाम शिरीन हे 100% शुद्ध बदामाचे तेल तान्ह्या बाळांच्या रोजच्या मालीशसाठीही उपयुक्त आहे; हे त्यांच्या त्वचेमध्ये खोलपर्यंत जाऊन ओलावा निर्माण करते आणि सहजपणे शोषले जाते. आता उजळ त्वचा मिळवणे आहे आपल्या हातात!

एवढेच नव्हे तर, आता आपण रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या हातांना व बोटांना या तेलाने नियमितपणे मसाज करून तुटणारी नखे आणि कोरड्या त्वचेपासून मुक्तता मिळवू शकता. कालांतराने आपण मजबूत नखे आणि पुष्ट त्वचा अनुभवू शकाल. याच्या नियमित वापराने स्ट्रेच मार्कची समस्याही दूर होण्यास मदत होते.

अशी केसांची निगा अन्यत्र कुठेही नाही

वर्षभर आपल्या केसांना कडकडीत ऊन आणि ओलावा नष्ट करणाऱ्या हिवाळ्याचा सामना करावा लागतो. रोगन बदाम शिरीन आपल्या स्कॅल्पचे आरोग्य सुधारून व पोषण करून तसेच केसांची गळती कमी करून आपली जादू दाखवते. आपळ्या केसांची लांबी कितीही असो, आठवड्यातून दोन वेळा हे तेल गरम करून त्याने मसाज केल्यास खूप फरक पडेल. हे नियमितपणे वापरा आणि लवकरच तुम्हाला अत्यंत मऊ आणि अधिक सुटसुटीत केस मिळवा.

खूप सारे आरोग्यविषयक फायदे मिळवा.

आपल्याला हे माहिती आहे का की, एक मोठा चमचा बदामाच्या तेलामध्ये 26% इतक्या प्रमाणात आपल्यासाठी शिफारस केले जाणारे ई जीवनसत्त्व आहे. पण इतकेच नाही, यामध्ये थोड्या प्रमाणात के जीवनसत्त्वही आहे, जे आपल्या हाडांना मजबुती देते. तसेच, या गोड बदामाच्या तेलामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो, वजन कमी होण्यास मदत होते आणि रक्तातील सक्रेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. सुरुवातीला झोपण्यापूर्वी व लहान मुलांनी नाष्ट्यापूर्वी गरम दुधात या बदामाच्या तेलाचे 5-10 थेंब टाकून प्यावेत. याचा नियमित वापर केल्याने मेंदू व नसा मजबूत होतील आणि आपल्या आतड्यांचे कार्य सुरळीत होण्यास मदत होईल.

स्वयंपाकात याचा वापर करा

एक सौम्य, दाणेदार चव असलेले रोगन बदाम शिरीन तेल अनेक पदार्थांची लज्जत वाढवते. आपण एखादे चविष्ट सलाड ड्रेसिंग बनवू शकता, पोषक फॅट्स वाढवण्यासाठी भात किंवा पास्तामध्ये घालू शकता किंवा एखाद्या साईड डिशवर घालून त्याचा स्वाद वाढवू शकता.

या बहुगुणी गोड बदामाच्या तेलाचा वापर कशाही प्रकारे करा, हा एक अष्टपैलू विजेता आहे हे नक्की!

येथे क्लिक करून मागवा आणि स्वतःसाठी याचा वापर करून पहा.

First published: December 18, 2020, 5:43 PM IST
Tags:

ताज्या बातम्या