मोदी सरकारचा मेगाप्लॅन : 30 रुपयांच्या कार्डवर होणार कॅन्सरचे उपचार

मोदी सरकारचा मेगाप्लॅन : 30 रुपयांच्या कार्डवर होणार कॅन्सरचे उपचार

तुम्हाला जर आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सगळ्यात आधी तुम्ही यासाठी पात्र आहात की नाही ते तपासावं लागेल. या योजनेत तुमचं किंवा कुटुंबातल्या सदस्यांचं नाव पाहायचं असेल तर https://www.pmjay.gov.in या वेबसाइटवर जाता येईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 ऑगस्ट : मोदी सरकार आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना मोठी भेट देणार आहे. या योजनेचा लाभ कॅन्सररुग्णही घेऊ शकतील. त्याचबरोबर गुडघ्याच्या वाट्या बदलण्याच्या ऑपरेशनसाठीही या योजनेतून लाभ घेता येईल. या योजनेअंतर्गत सध्या 1300 पेक्षा जास्त आजारांवर मोफत उपचार केले जातात.

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, आयुष्यमान भारत योजनेमध्ये दिल्या जाणाऱ्या 1300 मेडिकल पॅकेजचा आढावा घेण्यासाठी नीती आयोगाचे सदस्य प्राध्यापक विनोद पॉल यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने आता अहवाल दिला आहे.

या शिफारसींनुसार आयुष्यमान भारत योजनेत कॅन्सर केअर आणि इम्प्लांट सर्जरीसारख्या सुविधाही दिल्या जातील. त्याचबरोबर मोतीबिंदूसारख्या शस्त्रक्रिया मात्र यातून काढून टाकण्यात आल्या आहेत.

तुम्हाला जर आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सगळ्यात आधी तुम्ही यासाठी पात्र आहात की नाही ते तपासावं लागेल. या योजनेत तुमचं किंवा कुटुंबातल्या सदस्यांचं नाव पाहायचं असेल तर https://www.pmjay.gov.in या वेबसाइटवर जाता येईल.

एअर इंडियामध्ये नोकरीच्या संधी, या पदांसाठी करू शकता अर्ज

या वेबसाइटवर तुमचा मोबाइल नंबर टाका. त्यानंतर कॅप्चा अॅड करा. मग OTP जनरेट होईल. हा OTP नंबर अॅड करून तुमचं राज्य सिलेक्ट करा. तुमची माहिती भरून सर्च करता येईल.

आयुष्यमान भारत योजनेसाठी 14555 किंवा 1800 111 565 या हेल्पलाइनवर तुम्ही फोनही करू शकता. आयुष्यमान भारत योजनेसाठीचं गोल्डन कार्ड हॉस्पिटल आणि कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये बनवता येईल. ग्रामीण भागात अशी कॉमन सर्व्हिस सेंटर्स उघडण्यात आली आहेत.

===================================================================================================

हिटलरसमोर जर्मनीला धूळ चारणारे मेजर ध्यानचंद यांची रोमहर्षक कहाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 06:37 PM IST

ताज्या बातम्या