मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Health Insurance चा प्रीमियम वेळेत भरूनही नाही मिळाला क्लेम? वाचा कुठे करता येईल तक्रार

Health Insurance चा प्रीमियम वेळेत भरूनही नाही मिळाला क्लेम? वाचा कुठे करता येईल तक्रार

 इन्शुरन्सचा प्रीमियम भरुनही क्लेम न मिळू शकल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. तुमच्याबाबतही अशी घटना घडली असेल तर तुम्ही याबाबत तक्रार करू शकता.

इन्शुरन्सचा प्रीमियम भरुनही क्लेम न मिळू शकल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. तुमच्याबाबतही अशी घटना घडली असेल तर तुम्ही याबाबत तक्रार करू शकता.

इन्शुरन्सचा प्रीमियम भरुनही क्लेम न मिळू शकल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. तुमच्याबाबतही अशी घटना घडली असेल तर तुम्ही याबाबत तक्रार करू शकता.

  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 21 नोव्हेंबर: कोरोना काळाने नागरिकांना हेल्थ इन्शुरन्सचे (Health Insurance During Coronavirus) महत्त्व समजावून दिले आहे. अशाप्रकारे आपात्कालीन परिस्थितीत हेल्थ इन्शुरन्स असल्यामुळे अनेकांची मोठी समस्या दूर झाली आहे. मात्र काहींना याचा विरुद्ध अनुभव देखील आला. इन्शुरन्सचा प्रीमियम भरुनही क्लेम न मिळू शकल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. तुमच्याबाबतही अशी घटना घडली असेल तर तुम्ही याबाबत तक्रार करू शकता. काही विमा कंपन्यांनी कारणं देत ग्राहकांचे क्लेम रिजेक्ट केले आहेत.

विमा कंपन्यांनी का रिजेक्ट केले ग्राहकांचे क्लेम?

कोरोना काळात काही विमा कंपन्यांनी ग्राहकांचे क्लेम रद्द केले आहेत. यासाठी त्यांनी कारण असे दिले आहे की संबंधित कस्टमर्स घरीच बरे होऊ शकत आहेत आणि त्यांना रुग्णालयात भरती होण्याची आवश्यकता नाही. अशा प्रसंगी तुम्हाला तक्रार करता येऊ शकते.

हे वाचा-PM Kisan अंतर्गत ₹2000 नाही तर मिळणार ₹4000? यासह मिळतील हे 3 मोठे फायदे

विमा कंपनीने 30 दिवसांच्या आत विम्याची रक्कम दिली नाही तर तुम्ही लोकपाल (Ombudsman) कडे तक्रार करू शकता. झी बिझने दिलेल्या वृत्तानुसार, अलीकडेच एका प्रकरणात लोकपालने ग्राहकाच्या बाजूने मत मांडलं आहे. त्यांच्या मते, जर एखादी व्यक्ती आजारी आहे तर डॉक्टरांच्या निदानानंतर टीपीएचे (Third Party Administration) प्रश्न निराधार आहेत.

लोकपालकडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया

तुमचा क्लेम नाकारण्यात आल्यास तुम्ह लोकपालकडे तक्रार करू शकता. यावेळी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. शिवाय ई-मेलद्वारे तक्रार नोंदवता येते, अर्थात हे काम तुम्ही घरबसल्या करू शकता. देशात एकूण 17 लोकपाल केंद्र आहेत. IRDAI च्या वेबसाइटवर याबाबत तुम्हाला अधिक माहिती मिळेल. तुम्ही काउन्सिल फॉर इन्शुरन्स ओम्बड्समनचीही मदत घेऊ शकता

हे वाचा-15 X 15 X 15 नियमाने बदलून जाईल तुमचं आयुष्य; कमी वेळेत व्हाल कोट्याधीश! कसं?

TPAs म्हणजे कोण?

>> आरोग्य विमा क्लेमदरम्यान सर्व प्रथम TPA ला कळवा

>>TPA विमा ग्राहक आणि कंपनी यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करते

>> दावे आणि सेटलमेंट प्रक्रियेत मदत करणे हे त्याचे कार्य आहे

>> विमा कंपन्या TPA च्या सेवेसाठी पैसे देतात

First published:

Tags: Health, Money