Home /News /money /

Health Insurance : रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही रिजेक्ट होऊ शकतो कोविड क्लेम; तुमच्यासोबत असं झाल्यास काय कराल?

Health Insurance : रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही रिजेक्ट होऊ शकतो कोविड क्लेम; तुमच्यासोबत असं झाल्यास काय कराल?

कोविड चाचणीचा निकाल सकारात्मक आला तरीही आरोग्य विमा (Insurance Companies) कंपन्या कॅशलेस उपचाराचा दावा नाकारतात. कंपन्यांचे म्हणणे आहे की विमाधारकाने कोणत्याही गरजेशिवाय स्वतःला रुग्णालयात दाखल केले आहे.

    मुंबई : 23 जानेवारी : कोविड-19 चा संसर्ग (Coronavirus) पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील कोरोनामुळे रुग्णालयात दाखल असाल, तर आरोग्य विमा (Medical Insurance) असूनही, कंपन्या तुमचा क्लेम (Medial claim) नाकारू शकतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कोविडच्या सौम्य लक्षणांनंतर रुग्णालयात दाखल होणे. सर्दी, ताप यासारखी सौम्य लक्षणे दिसू लागल्यावरही अनेक जण रुग्णालयात दाखल होतात, असे विमा क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांना भीती वाटते की त्यांचा आजार जीवघेणा ठरू शकतो. अशा परिस्थितीत, कोविड चाचणीचा निकाल सकारात्मक आला तरीही आरोग्य विमा (Insurance Companies) कंपन्या कॅशलेस उपचाराचा दावा नाकारतात. कंपन्यांचे म्हणणे आहे की विमाधारकाने कोणत्याही गरजेशिवाय स्वतःला रुग्णालयात दाखल केले आहे. ही अडचण शेकडो विमाधारकांसमोर येत आहे. डॉक्टरांनी त्याला रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला असला तरीही ही अडचण अनेकांना येत आहे. मधुमेह किंवा इतर कोणत्याही आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना या समस्येचा सर्वाधिक सामना करावा लागतो. कर्जाच्या जाळ्यातून बाहेर पडण्यासाठी Financial Tips, वाचा सोप्या टिप्स ICMR च्या मार्गदर्शक तत्वांचा आधार घेतायेत कंपन्या इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या नुकत्याच जारी केलेल्या गाईडलाईन्सचा अवलंब करून आरोग्य विमा कंपन्या क्लेम नाकारत आहेत. ICMR ने आपल्या उपचार प्रोटोकॉलमध्ये (treatment protocol) सांगितले होते की जोपर्यंत श्वास घेण्यास त्रास होत नाही किंवा ऑक्सिजनची पातळी कमी होत नाही तोपर्यंत रुग्णांनी कोविड-19 वर घरीच उपचार करावेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. यानंतर रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली, मात्र काही लोक घाबरून रुग्णालयात जात आहेत. Mutual Fund SIP : दरमाह 1000 रुपये वाचवा आणि बना कोट्यधीश, छोट्या गुंतवणुकीत कमाईची संधी क्लेम फेटाळल्यास काय कराल विमा कंपनीने तुमचा क्लेम नाकारला आहे, परंतु तुम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय योग्य वाटत असेल, तर तुम्ही कंपनीच्या तक्रार निवारण कक्षात दावा करू शकता. तिथूनही तुम्हाला योग्य उत्तर न मिळाल्यास, तुम्ही तुमच्या शहरातील विमा लोकपाल कार्यालयाकडे तक्रार करू शकता. त्यावरही हे प्रकरण मिटले नाही तर ग्राहक न्यायालय (Consumer Court) हाच शेवटचा पर्याय असेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Insurance, Money

    पुढील बातम्या