Home /News /money /

HDFC Securities ने 'या' मल्टीबॅगर स्टॉकची टार्गेट प्राईज वाढवली, चेक करा डिटेल्स

HDFC Securities ने 'या' मल्टीबॅगर स्टॉकची टार्गेट प्राईज वाढवली, चेक करा डिटेल्स

निओजेन केमिकल्स लिमिटेड (NCL) कंपनीने 250 MT क्षमतेचे इलेक्ट्रोलाइट फॉर्म्युलेशन युनिट स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीने कंपनीचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला आहे.

    मुंबई, 25 जानेवारी : ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने (HDFC Securities) स्पेशॅलिटी केमिकल मेकर कंपनी निओजेन केमिकल्स लिमिटेड (Neogen Chemicals Ltd) वर पॉझिटिव्ह रेटिंग दिली आहे. कंपनीच्या शेअरला BUY रेटिंग देऊन त्याची टार्गेट प्राईज 1470 रुपयांवरून 2150 रुपये केली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने एका नोटमध्ये म्हटले आहे की कंपनीची फंडमेंटल्स मजबूत आहेत आणि स्टॉक पुढे जाऊन चांगला परतावा देऊ शकतो. निओजेन केमिकल्सच्या स्टॉकने (Chemical Stock) एका वर्षात 128 टक्के मल्टीबॅगर परतावा (Multibagger Return) दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत स्टॉक 80 टक्क्यांनी वाढला आहे. निओजेन केमिकल्स लिमिटेड (NCL) कंपनीने 250 MT क्षमतेचे इलेक्ट्रोलाइट फॉर्म्युलेशन युनिट स्थापन करणार असल्याची घोषणा केली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीने कंपनीचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला आहे. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की कंपनीने लिथियम आयन बॅटरी आणि ACC (Advance Chemistry Cell) च्या उत्पादनात उतरण्याचा निर्णय घेऊन एक मोठे पाऊल उचलले आहे. याचा भविष्यात कंपनीला खूप फायदा होईल. अनेक IPO मुळे गेल्यावर्षी बंपर कमाई, मात्र यावर्षी यातील 16 कंपन्यामुळे मोठं नुकसान PLI योजनेचे फायदे केंद्र सरकारने देशात अॅडव्हान्स केमिस्ट्री सेल (ACC) च्या निर्मितीसाठी प्रोडक्शन युनिट स्थापन करण्यासाठी 2 अब्ज रुपयांची PLI योजना सुरू केली आहे. ही योजना ACC उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि देशातील सप्लाय चेन मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देईल. निओजेन केमिकल्ससारख्या कंपन्यांना याचा फायदा होणार आहे. निओजेन केमिकल्स सध्या नॉन-इलेक्ट्रोलाइट अॅप्लिकेशन्ससाठी लिथियम सॉल्ट तयार करते. आता कंपनी या कौशल्याचा फायदा लिथियम आयन बॅटरीजच्या निर्मितीमध्ये घेणार आहे. शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक; सेन्सेक्समध्ये 366 अंकांची तर निफ्टीत 128 अंकांची उसळी कंपनीची ग्रोथ होईल ब्रोकरेज फर्मने आपल्या नोटमध्ये म्हटले आहे की निओजेन केमिकल्स ही एक इंटिग्रेटेड कंपनी आहे. कंपनी लिथियम सॉल्ट आणि इलेक्ट्रोलाइट फॉर्म्युलेशन दोन्ही विकते. कंपनीला अपेक्षा आहे की पुढील 5-6 वर्षांमध्ये, कंपनी तिच्या इलेक्ट्रोलाइट फॉर्म्युलेशन प्रोडक्ट आणि ऑरगॅनिक्स केमिकल व्यवसायाच्या क्षमता विस्तारासाठी मोठी गुंतवणूक करेल. यामुळे कंपनीची ग्रोथ होईल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या