मराठी बातम्या /बातम्या /मनी /

'या' स्मॉलकॅप टेक्सटाईल शेअरमध्ये सहा महिन्यात 23 टक्के रिटर्नचा अंदाज, HDFC Securities चा गुंतवणुकीचा सल्ला

'या' स्मॉलकॅप टेक्सटाईल शेअरमध्ये सहा महिन्यात 23 टक्के रिटर्नचा अंदाज, HDFC Securities चा गुंतवणुकीचा सल्ला

Siyaram Silk Mills Limited कंपनीच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीची कामगिरी अतिशय मजबूत राहिली आहे. या कालावधीत कंपनीचे उत्पन्न वार्षिक आधारावर 1.76 पटीने आणि तिमाही आधारावर 1.06 पटीने वाढून 480 कोटी रुपये झाले आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 21 नोव्हेंबर : भारतातील अग्रगण्य इक्विटी ब्रोकिंग फर्म HDFC Securities ने स्मॉलकॅप टेक्सटाईल स्टॉक (Textile Stock) सियाराम सिल्क मिल्स लिमिटेडमध्ये (SSML) 559 रुपयांच्या टार्गेटसह गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. या शेअरची सध्याची किंमत सुमारे 454 रुपये आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की या शेअरमध्ये 23 टक्क्यांनी वाढ होऊ शकते आणि तो 559 रुपयांपर्यंत वाढू शकतो. सियाराम सिल्क मिल्स (Siyaram Silk Mills Limited) ही ग्लोबर फॅब्रिक्स मॅन्युपॅक्चरर कंपनी आहे. कंपनीकडे ISO 9001:2008 सर्टिफिकेट आहे.

Siyaram Silk Mills Limited कंपनीच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीची कामगिरी अतिशय मजबूत राहिली आहे. या कालावधीत कंपनीचे उत्पन्न वार्षिक आधारावर 1.76 पटीने आणि तिमाही आधारावर 1.06 पटीने वाढून 480 कोटी रुपये झाले आहे. या कालावधीत कंपनीच्या फॅब्रिक्स सेगमेंटमध्ये तिमाही आधारावर व्हॉल्यूममध्ये 70 टक्के वाढ झाली आहे आणि ती 23 लाख मीटर इतकी आहे. या कालावधीत कंपनीची रियलायझेशन 164 रुपये प्रति मीटर झाली आहे. तिमाही आधारावर 23 टक्के वाढ झाली आहे.

Mutual Fund : 15 X 15 X 15 नियमाने बदलून जाईल तुमचं आयुष्य; कमी वेळेत व्हाल कोट्याधीश! कसं?

कंपनीला लोअर डिस्काऊंट आणि प्रोडक्ड पोर्टफोलिओमध्ये विस्तारामुळे फायदा झाला आहे. या कालावधीत कंपनीचा EBITDA मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 6 कोटी रुपयांच्या EBITDA तोट्याच्या तुलनेत 85 कोटी रुपये होता. तिमाही आधारावर, कंपनीच्या EBITDA मध्ये 1.9 पट वाढ झाली आहे.

कंपनीचे EBITDA मार्जिन या कालावधीत वार्षिक 12.4 टक्क्यांवरून 17.6 टक्क्यांपर्यंत वाढले आहे, जी आतापर्यंतची सर्वोत्तम तिमाही कामगिरी आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला 52 कोटी रुपयांचा नफा झाला आहे, तर गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला 14 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

Dolly Khanna पोर्टफोलिओच्या या शेअरने दिला 4100% रिटर्न! तुमच्याकडे आहे का?

HDFC सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की पुढे कंपनीच्या व्यवसायात चांगल्या वाढीची अपेक्षा आहे. कंपनीची बॅलेन्सशीट खूप मजबूत आहे. कंपनीचा ब्रँडही खूप मजबूत आहे. आगामी लग्नाच्या हंगामात कंपनीच्या व्यवसायात आणखी वाढ होणार आहे. हे पाहता या शेअरमध्ये खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो आहे.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे असे मत आहे की गुंतवणूकदारांनी हा शेअर 465 रुपयांच्या आसपास खरेदी करावा आणि त्यानंतर जर पडझड झाली तर 410 रुपयांपर्यंत खाली आला तर त्यात आणखी खरेदी करा. या शेअरमध्ये 559 रुपयांची पातळी पाहायला मिळत आहे.

First published:

Tags: Investment, Money, Share market