Home /News /money /

HDFC Securities ची 'या' मल्टिबॅगर शेअरमध्ये खरेदीची शिफारस, तुम्हालाही गुंतवणूक करायचीय?

HDFC Securities ची 'या' मल्टिबॅगर शेअरमध्ये खरेदीची शिफारस, तुम्हालाही गुंतवणूक करायचीय?

रिअल इस्टेट क्षेत्राशी (Real Estate Sector) संबंधित Shobha हा असा एक स्टॉक ज्याने गुंतवणूकदाराना उत्कृष्ट परतावा दिला आहे. Sobha Ltd हा स्टॉक रिअल इस्टेट क्षेत्राचा आउटपरफॉर्मर स्टॉक असल्याचे सिद्ध झाले आहे.

    मुंबई, 9 नोव्हेंबर : कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर (Corona Crises) भारतीय शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना (Share Market Investors ) जबरदस्त परतावा दिला आहे. या कालावधीत असे अनेक स्टॉक्स आहेत ज्यांचा या वर्षातील मल्टीबॅगर स्टॉकच्या (Multibagger Stock) यादीत समावेश करण्यात आला आहे. रिअल इस्टेट क्षेत्राशी (Real Estate Sector) संबंधित Shobha हा असाच एक स्टॉक आहे. Sobha Ltd हा स्टॉक रिअल इस्टेट क्षेत्राचा आउटपरफॉर्मर स्टॉक असल्याचे सिद्ध झाले आहे. आतापर्यंतच्या तेजीनंतरही, HDFC Securities ला अजूनही या स्टॉकमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. HDFC सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की हा स्टॉक पुढील 3 महिन्यांत 970 रुपयांची पातळी गाठू शकतो. Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या 'या' शेअरमध्ये ब्रेकआऊट, गुंतवणूकदारांना खरेदीची संधी एचडीएफसी सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की Sobha Ltd च्या वीकली टाइम फ्रेम चार्टवरून असे दिसून येत आहे की स्टॉक गेल्या अनेक महिन्यांपासून स्थिर आहे. शोभाच्या शेअरची किंमत वीकली चार्टवर वरच्या टॉप हाय बॉटमसह सतत वरची हालचाल दाखवत आहे. या स्टॉकवर नुकताच 756 चा स्विंग लो हा या क्रमाचा नवीन हायर बॉटम असू शकतो. इतर टेक्निकल बाबींवर नजर टाकली, तर या शेअरमध्ये तेजीची सर्व चिन्हे दिसत आहेत, त्यामुळे या शेअरमध्ये आणखी वाढ होण्याची पूर्ण शक्यता आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे असे मत आहे की Sobha Ltd मध्ये 3 महिन्यांसाठी 970 रुपयांचे टार्गेट 790 रुपयांच्या स्टॉपलॉससह खरेदी केले जाऊ शकते. Credit Card च्या कर्जातून मुक्तता हवी? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करा टेन्शन दूर होईल एचडीएफसी सिक्युरिटीजचे असेही म्हणणे आहे की जर या स्टॉकमध्ये घसरण होत असेल, तर 815 रुपयांच्या आसपास अधिक हळूहळू खरेदी सुरू करावी.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या