मुंबई, 27 डिसेंबर : यंदाच्या वर्षात गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात (Share Market Investors) बराच नफा मिळवला आहे. त्यामुळे पुढील वर्षात कोणत्या शेअरवर नजर ठेवायची याचं देखील प्लानिंग अनेकांनी सुरु केलं आहे. ब्रोकिंग आणि रिसर्च फर्म HDFC सिक्युरिटीजने आगामी वर्ष 2022 साठी त्यांच्या टॉप स्टॉक पिक्स (Top Stock Picks) यादी जारी केली आहे. ब्रोकरेज फर्मने स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ची बँकिंग क्षेत्रातील टॉप स्टॉक पिकमध्ये निवड केली आहे. ब्रोकरेजचा असा विश्वास आहे की भारतातील सर्वात मोठी बँक आता कोणत्याही लायबिलिटी संबंधित जोखमीपासून अक्षरशः मुक्त आहे.
ब्रोकरेजने एका नोटमध्ये म्हटले आहे की, एसबीआयच्या लोन बुकची क्वालिटी चांगली आहे. इतर अनेक मोठ्या बँकांपेक्षा मालमत्तेच्या गुणवत्तेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते अधिक चांगले आहे. शिवाय, पुरेशा प्रोव्हिजन कव्हरेज प्रदान करून, सतत वाढत जाणारी लोन लॉस प्रोव्हिजन कमी होईल.
YONO सोबत 58 टक्के बचत खाती उघडली
HDFC सिक्युरिटीने पुढे म्हटलं की, डिजिटायझेशनच्या आघाडीवर, बँकेचे YONO अॅप सर्व मेट्रिक्समध्ये मजबूत एंगेजमेंट निर्माण करत आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत, किरकोळ मालमत्ता खाती 37 टक्के आणि बँकेची 58 टक्के बचत खाती YONO द्वारे उघडण्यात आली.
केंद्र सरकारकडून मिळतोय 10 हजारांचा थेट लाभ, मार्चआधी 'ही' कामं करुन घ्या; काय आहे योजना?
सुधारणांमुळे SBI हा एक चांगला पर्याय बनला
ब्रोकरेजने सांगितले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये, SBI उत्तम PCR, मजबूत भांडवलीकरण, उत्कृष्ट लायबिलिटी फ्रँचायझी आणि चांगल्या अॅसेट क्वॉलिटी आऊटलूकसह SBI हा सर्वोत्तम पर्याय आहे.
SBI ने यावर्षी 63 टक्के परतावा दिला
SBI ची साईज आणि एक्सपोजर पाहता, काही महत्त्वपूर्ण धोके देखील आहेत. यामध्ये, विविध भौगोलिक प्रदेशांमध्ये खाजगी बँकांचा वाढता शिरकाव आणि स्थूल-आर्थिक धोक्यांमुळे त्यांच्या बाजारपेठेतील हिस्सा मोठ्या प्रमाणात घसरण्याची शक्यता ही प्रमुख चिंतेची बाब आहे.
SBI च्या शेअर्सनी यावर्षी सुमारे 63 टक्के परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात त्याच्या स्टॉकमध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
31 डिसेंबरआधी 'हे' काम करुन घ्या, अन्यथा सीज होईल बँक अकाऊंट
नफ्यात 66.7 टक्क्यांची वाढ
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत, SBI च्या करानंतरच्या नफ्यात 66.7 टक्क्यांची वाढ झाली आहे. निव्वळ व्याज उत्पन्नात (NII) वाढ आणि मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण योगदान दिले. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत बँकेने 4,574 कोटी रुपयांचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स नोंदवला होता. बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न सप्टेंबरच्या तिमाहीत 10.6 टक्क्यांनी वाढून 31,184 कोटी रुपये झाले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 28,181 कोटी रुपये होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.