Home /News /money /

HDFC Securities ची 'या' मल्टीबॅगर एनर्जी स्टॉकवर नजर; आणखी तेजीची शक्यता

HDFC Securities ची 'या' मल्टीबॅगर एनर्जी स्टॉकवर नजर; आणखी तेजीची शक्यता

ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने Hitachi Energy India च्या स्टॉकला बाय रेटिंग दिले आहे. ब्रोकरेज हाऊसला अपेक्षा आहे की पुढील 3 महिन्यांत या स्टॉकमध्ये 2850-3100 रुपयांचे टार्गेट पाहिले जाऊ शकते.

    मुंबई, 14 जानेवारी : Hitachi Energy India च्या स्टॉकने गेल्या 1 वर्षात 106 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या 6 महिन्यांत हा स्टॉक 38 टक्क्यांपर्यंत गेला आहे. अशा परिस्थितीत देशांतर्गत ब्रोकरेज फर्म HDFC Securitiesचे म्हणणे आहे की, हा मल्टीबॅगर स्टॉक येत्या 3 महिन्यांत सध्याच्या पातळीपासून आणखी वाढू शकतो. ब्रोकरेज फर्मने जारी केलेल्या नोटमध्ये म्हटले आहे की स्टॉकने डेली चार्टवरील खाली जाणारा ट्रेंडलाइन मोडला आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की स्टॉक तेजीच्या ट्रेंडमध्ये आहे आणि त्याच्या सर्व महत्त्वाच्या मूव्हिंग अॅव्हरेजच्या वर ट्रेड करत आहे. Budget 2022 : अर्थसंकल्पात काळानुरुप झालेले बदल आणि महत्त्वाच्या गोष्टी, तुम्हाला माहिती आहेत का ब्रोकरेज फर्म एचडीएफसी सिक्युरिटीजने Hitachi Energy India च्या स्टॉकला बाय रेटिंग दिले आहे. ब्रोकरेज हाऊसला अपेक्षा आहे की पुढील 3 महिन्यांत या स्टॉकमध्ये 2850-3100 रुपयांचे टार्गेट पाहिले जाऊ शकते. ब्रोकरेज फर्मने यासाठी 2,370 रुपये स्टॉप लॉस ठेवण्याचा सल्ला दिला आहे. Hitachi Energy India लिमिटेडचे ​​जुने नाव ABB पॉवर प्रॉडक्ट्स अँड सिस्टम्स इंडिया लिमिटेड होते. Hitachi Energy India ची ही भारतीय शाखा आहे. विशेष म्हणजे हिताची एनर्जी ही ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी आहे. कंपनी युटिलिटी, इतर मोठे उद्योग, वाहतूक आणि पायाभूत सुविधा कंपन्या आणि वीज कंपन्यांना सेवा पुरवते. Budget 2022: आर्थिक सर्वेक्षण म्हणजे नेमकं काय? बजेटआधी सादर केला जातो Economic Survey सध्या, दुपारी 3 च्या सुमारास, Hitachi Energy India लिमिटेडचा शेअर NSE वर 23.85 रुपये किंवा 0.90 टक्क्यांच्या वाढीसह 2667 रुपयांवर ट्रेड करत आहे. शेअर आजच्या व्यवहारात 2,643.15 वर उघडला तर काल तो 2,643.15 रुपयांवर बंद झाला. कंपनीचे मार्केट कॅप 11,400 कोटी रुपये आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money, Share market

    पुढील बातम्या