घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर! HDFC नं कमी केले व्याजदर, 'इतकं' स्वस्त EMI

घर खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर! HDFC नं कमी केले व्याजदर, 'इतकं' स्वस्त EMI

HDFC, Bank - तुम्ही कर्ज काढून घर खरेदी करणार असाल तर चांगली बातमी आहे

  • Share this:

मुंबई, 01 ऑगस्ट : घर खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. गृहकर्ज देणारी कंपनी HDFC नं व्याजदरात 0.10 टक्के कपात केलीय. HDFC नं ही कपात वेगवेगळ्या काळातल्या रिटेल कर्जाच्या व्याजावर केलीय. नव्या ग्राहकांना ही कपात लागू होईलच, पण याचा फायदा आधीच्या ग्राहकांनाही मिळेल. HDFCचे हे नवे दर आजपासून (1ऑगस्ट) लागू होतायत.

एचडीएफसी 30 लाखापर्यंतच्या  गृहकर्जावर 8.60 टक्के व्याज देणार आहे. तसंच 30 लाख रुपयापासून 75 लाख रुपयापर्यंतच्या कर्जावर 8.85 टक्के व्याज असेल. 75 लाखापेक्षा जास्त कर्ज घेतलं तर 8.90 टक्के व्याज दर लागू होईल.

'या' गोष्टी आजपासून होणार 'स्वस्त', कुठल्या व्यवहारांमध्ये वाचणार पैसे?

महिला ग्राहकांसाठी व्याज दर

महिला ग्राहकांना 8.55 टक्के व्याजावर 30 लाख रुपयापर्यंत कर्ज घेता येईल. याप्रमाणे 30 लाखापासून 75 लाखापर्यंतच्या गृहकर्जावर 8.80 टक्के व्याज द्यावं लागेल.

TRP मीटर : सासूबाई आल्या पहिल्या पाचात, पण नवऱ्याच्या बायकोचं काही खरं नाही!

या बँकांनीही कमी केली कर्ज

युनियन बँक ऑफ इंडिया आणि SBIनंही कर्ज कमी केलीयत.स्टेट बँक ऑफ इंडियानं आयएमपीएस दर काढून टाकलेत. आता तुम्ही SBIचा योनो अॅप, इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंगद्वारे फंड ट्रान्सफर करणार असाल तर तुम्हाला कसलाच दर पडणार नाही. बँकेनं आधीच आरटीजीएस आणि एनईएफटी दर रद्द केले होते. आता IMPS दर रद्द केल्यानं SBIच्या ग्राहकांना ऑनलाइन ट्रॅन्झॅक्शन करणं सोपं जाईल.

लवकरच तुमच्या हातात असेल 20 रुपयांची नवी नोट, 'ही' असेल खासीयत

तसंच,1 ऑगस्टपासून इलेक्ट्रिक वाहनं खरेदी करणं स्वस्त होणार आहे. जीएसटी काउन्सिलनं बॅटरीवर चालणाऱ्या कार आणि बाइकवर लागणारा GST कमी केला आहे. जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत हे दर कमी केले. इलेक्ट्रिक व्हेइकलवर जीएसटीचे दर 12 टक्क्यांहून कमी होऊन 5 टक्के झाले आहेत. या निर्णयामुळे कार खरेदी करणं 70 हजार रुपयापर्यंत स्वस्त झालं आहे. तर चार्जरवरचा जीएसटी 18 टक्क्यांहून कमी होऊन 12 टक्के झाला आहे.

1 ऑगस्टनंतर इलेक्ट्राॅनिक कारवरचा जीएसटी कमी झाला आहे. तुम्ही 10 लाख रुपयांपर्यंत इलेक्ट्रिक कार खरेदी करत असाल, तर 1 ऑगस्टनंतर तुमचे 70 हजार रुपये वाचतील. समजा तुम्ही 1 लाख रुपयांची इलेक्ट्रिक बाइक खरेदी करत असाल तर 7 हजार रुपये कमी खर्च येईल.

डोंबिवलीत 2 भावांवर 10 ते 15 तरुणांचा जीवघेणा हल्ला, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: HDFC
First Published: Aug 1, 2019 04:34 PM IST

ताज्या बातम्या