मराठी बातम्या /बातम्या /मनी /

वृद्धापकाळाचं टेन्शन कमी करा; HDFC Life Systematic Retirement Plan लॉन्च, काय आहेत फायदे?

वृद्धापकाळाचं टेन्शन कमी करा; HDFC Life Systematic Retirement Plan लॉन्च, काय आहेत फायदे?

खाजगी क्षेत्रातील विमा कंपनी एचडीएफसी लाइफने (HDFC Life) तुमच्यासाठी एक उत्तम योजना आणली आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही वृद्धापकाळाचा खर्च सहज सांभाळू शकता. याद्वारे तुम्ही तुमचा निवृत्तीनंतरचा खर्च सहज भागवू शकता.

  • Published by:  Pravin Wakchoure
मुंबई, 17 डिसेंबर : नोकरदार वर्गासाठी पुढील भविष्याची नेमहीच चिंता असते. निवृत्तीनंतर वृद्धापकाळात पेन्शन (Retirement Pension Plan) असेल तर ठिक नाहीतर इनकम सोर्स कायम राहावा यासाठी सर्वांचा प्रयत्न असतो. तुम्हालाही तुमचे म्हातारपण सुरक्षित ठेवायचे असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. वास्तविक, खाजगी क्षेत्रातील विमा कंपनी एचडीएफसी लाइफने (HDFC Life) तुमच्यासाठी एक उत्तम योजना आणली आहे, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही वृद्धापकाळाचा खर्च सहज सांभाळू शकता. याद्वारे तुम्ही तुमचा निवृत्तीनंतरचा खर्च सहज भागवू शकता. पॉलिसीच्या सुरुवातीपासून वार्षिक व्याजदर लॉक करण्याची परवानगी ग्राहकाची सेवानिवृत्ती लक्षात घेऊन कंपनीने 'HDFC लाइफ सिस्टमॅटिक रिटायरमेंट प्लान' (HDFC Life Systematic Retirement Plan) लॉन्च केला आहे. ही एक इंडिविजुअल, ग्रुप, नॉन-पार्टिसिपेटिंग, नॉन-लिंक्ड, सेविंग्स डेफर्ड एन्युटी योजना आहे. ही योजना ग्राहकांना पॉलिसीच्या प्रारंभापासून त्यांचे वार्षिक व्याजदर लॉक करण्यास अनुमती देते. 22रुपयांचा हा शेअर एका वर्षात झाला 354रुपये,1 लाखाचे झाले 16 लाखांहून अधिक रुपये HDFC लाइफ सिस्टेमॅटिक रिटायरमेंट प्लॅनमध्ये दोन पर्याय आहेत. 1) लाइफ अॅन्युइटी (Life Annuity) आणि 2) लाइफ एन्युटी विथ रिटर्न ऑफ प्रीमियम (Life Annuity with Return of Premiums). Motilal Oswal ची 'या' फर्टिलायझर शेअरला BUY रेटिंग, 40 टक्के परताव्याची शक्यता एचडीएफसी लाइफ सिस्टिमॅटिक रिटायरमेंट प्लॅनची ​​वैशिष्ट्ये >> एखाद्या व्यक्तीला 5 ते 15 वर्षे प्रीमियम भरण्याची मुदत निवडण्याचा पर्याय आहे. >> ग्राहक 15 वर्षांपर्यंत डिफरमेंट कालावधी (Deferment Period) निवडू शकतात. >> या योजनेअंतर्गत, कोणत्याही वैद्यकीय आणि अंडररायटिंगशिवाय 24 तासांच्या आत पॉलिसी जारी करण्याची सुविधा आहे. >> मर्यादित कालावधीसाठी प्रीमियम भरून, तुम्ही आयुष्यभर निश्चित इनकम मिळवू शकता. >> योजना निवडण्यासाठी व्यक्तीचे किमान वय 45 वर्षे आणि कमाल 75 वर्षे असावे. >> प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर भरला जाऊ शकतो.
First published:

Tags: Hdfc bank, Investment, Pension

पुढील बातम्या