मराठी बातम्या /बातम्या /मनी /

घर ते स्मार्टहोम: या दिवाळीमध्ये आपल्या घराची शोभा वाढवा अप्रतिम ऑफर्सच्या मदतीने

घर ते स्मार्टहोम: या दिवाळीमध्ये आपल्या घराची शोभा वाढवा अप्रतिम ऑफर्सच्या मदतीने

आपल्या पसंतीचे बरेच पर्याय स्मार्ट होण्याकडे वळत आहेत, ही वेळ आहे या उपकरणांचा वापर करून आपले घर स्मार्टहोम बनवण्याची.

आपल्या पसंतीचे बरेच पर्याय स्मार्ट होण्याकडे वळत आहेत, ही वेळ आहे या उपकरणांचा वापर करून आपले घर स्मार्टहोम बनवण्याची.

आपल्या पसंतीचे बरेच पर्याय स्मार्ट होण्याकडे वळत आहेत, ही वेळ आहे या उपकरणांचा वापर करून आपले घर स्मार्टहोम बनवण्याची.

दिवाळीची तयारी ही साधारणपणे साफसफाई करण्यापासून सुरू होते आणि घराचा कानाकोपरा योजनापूर्वक सुशोभित केला जातो. हे सणासुदीचे दिवस म्हणजे छोट्या-मोठ्या वस्तूंच्या खरेदीसाठीची मंगल वेळ, यासाठीच वर्षातील यावेळेस ऑनलाईन-ऑफलाईन सेल्स जाहीर होतात. आपण आपल्या घराचा कायापालट करू इच्छित असाल, तर ही खरेदीची योग्य वेळ आहे.

आधुनिक जीवनशैली म्हणजेच स्मार्ट जीवनशैली. आणि जर आपण एक टेक्नो-सॅव्ही व्यक्ती असाल तर, आपले घर हे अद्ययावत व स्मार्ट टेक्नोलॉजीने सुसज्ज असेल. मग, या फेस्टीव्ह सेल्सचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि या कल्पक उपकरणांनी आपल्या घराचे रंगरूप आणि वातावरण यांमध्ये एक चांगला बदल घडवा.

1. स्मार्ट टीव्ही

नेटफ्लिक्सवरची एखादी सिरीज बघायची असो, मित्रांबरोबर आयपीएलच्या सामन्यांचा आनंद घ्यायचा असो किंवा आपल्या कुटुंबाबरोबर शनिवारी रात्री एखादा चित्रपट पहायचा असो एखादा स्मार्ट टीव्ही मनोरंजनाची दुनिया अगदी आपल्या पुढ्यात आणून ठेवतो, आणि त्याचा वापर आणि हाताळणी अतिशय सोपीही असते. त्याच्या इन-बिल्ट स्मार्टफोन कंपॅटीबिलीटीमुळे आता आपल्याला रिमोट कंट्रोल शोधण्याची गरज भासणार नाही. तुम्ही यावर वेब ब्राउज करू शकता, गेम्स खेळू शकता किंवा अन्य कंपॅटीबल डिव्हायसेसशी जोडू शकता.

HDFC Bank फेस्टीव्ह ट्रीट्स ऑफरच्या मदतीने आपण 22.5% पर्यंत कॅशबॅक + HDFC Bank Debit & Credit Cards वर नो-कॉस्ट ईएमआय किंवा सुलभ हप्त्यांद्वारे Samsung, LG किंवा Panasonic चा नवा कोरा स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. भरीस भर म्हणजे, या फेस्टीव्ह  ट्रीट्स ऑफरचा एक भाग म्हणून प्रत्येक तासाला सर्वाधिक किंमतीची खरेदी करणारे ग्राहक Apple iPad Air( अटी व शर्ती लागू) जिंकू शकतात.

2. स्मार्ट होम असिस्टंट

ते दिवस सरले जेव्हा स्मार्ट होम सिस्टिम्सद्वारे आपल्याला केवळ गाणी ऐकता येत असत किंवा एखादा कॉल करता येत असे. आता, स्मार्ट होम सिस्टिम्स आपल्या जीवनात अधिक सुविधा निर्माण करतात.  Amazon Alexa व Google Home सारखे डिव्हायसेस कुकिंग रीमायंडर्स सेट करणे, अलार्म्स नियंत्रित करणे, किंवा अगदी आपल्यासाठी बातम्या वाचणे आणि खरेदीसाठी मदत करणे यांसारखी कामे करून आपल्याला थोडा मोकळेपणा देतात.

याच्या खरेदीसाठी आपल्याला मदत व्हावी म्हणून HDFC Bank फेस्टीव्ह ट्रीट्सद्वारे 5X रिवार्ड पॉईंट्स मिळवा किंवा स्मार्टबायद्वारे केलेल्या Amazon वरील खरेदीसाठी 5% कॅशबॅक मिळवा. Reliance Digital, Croma आणि अन्य स्टोअर्समध्ये आपण 10% कॅशबॅक आणि नो-कॉस्ट ईएमआयसुद्धा मिळवू शकता.

3. स्मार्ट लायटिंग

आपल्या आवाजाद्वारे दिवे नियंत्रित करणे हे भविष्य सूचक स्वप्न सत्यात उतरले आहे. स्मार्ट लायटिंग फिक्स्चर्स आपल्या स्मार्टफोनवरून नियंत्रित केले जाऊ शकतात आणि त्यांना चालू आणि बंद करणे यापेक्षाही अधिक काही करता येते. प्रकाश कमी जास्त करता येणे किंवा त्यांचे रंग बदलता येणे यांसारख्या वैशिष्ट्यांमुळे हे स्मार्ट दिवे उत्सवाचे वातावरण निर्माण करण्यासाठी एक  अचूक पर्याय ठरतात. आपण त्यांना आपल्या स्मार्ट होम असिस्टंटशी जोडून अधिक सुलभता आणि व्हॉइस कंट्रोल मिळवू शकता.

4. वायफाय नियंत्रित गृह सुरक्षा यंत्रणा

स्मार्ट डिव्हायसेस केवळ आपल्या सोयीचीच नव्हे तर आपल्या सुरक्षिततेची देखील काळजी घेतात. अशी स्मार्ट गुंतवणूक म्हणजे एक वायफाय नियंत्रित गृह सुरक्षा यंत्रणा, जी आपण दूर असतांनाही आपल्या घराची काळजी घेते. या स्मार्ट लॉकिंग सिस्टम्स दूरच्या अंतरावरूनही नियंत्रित केल्या जाऊ शकतात आणि आपल्या स्मार्टफोनद्वारे आपल्या घराच्या सुरक्षिततेचे नियंत्रित करण्याची मुभा देतात. आपला अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी आणि आग आणि पूर यासारख्या पर्यावरणीय धोक्यांपासून आपल्याला वाचवण्यासाठी हे आपल्या स्मार्ट होम असिस्टंटशी देखील जोडता येते.

5. रोबोटिक व्हॅक्युम क्लीनर्स

घर स्वच्छ आणि लखलखीत ठेवायचे असेल तर स्वयंचलित व्हॅक्युम क्लीनर्सना पर्याय नाही. सणाचा सर्व उत्साह ओसंडून जात असताना आपले घर स्वच्छ ठेवण्यासाठी हे विशेषतः उपयोगी ठरतात. यांचे पूर्णपणे वायरलेस डिझाइन पूर्वीच्या अवजड व्हॅक्यूमपेक्षा अत्यंत प्रगत आहेत. याव्यतिरिक्त, ते आकाराने छोटे आहेत, घराच्या साफसफाईसाठी त्याचा आराखडा लक्षात ठेवण्याइतके पुरेसे बुद्धिमान आणि चार्जिंग स्टेशनकडे जाणारा मार्ग शोधण्यासाठी ते सक्षम आहेत. म्हणूनच, रोबोट क्लिनरच्या मदतीने आपण कचरा साफ करण्याची चिंता सोडून आपल्या प्रियजनांबरोबर मोकळेपणा आणि आनंद घेऊ शकता.

HDFC Bank च्या मदतीने आपल्या खरेदीवर बचत करा

या व्यतिरिक्त आपण फ्रीज, डिशवॉशर, वॉशिंग मशीन, एसी यांसारखी घरगुती उपकरणे किंवा आपल्याला आवश्यक असलेल्या अन्य कोणत्याही वस्तू खरेदी करू शकता. Pai International, Godrej, Viveks, Carrier, Whirlpool आणि इतर स्टोअरमध्ये 10% पर्यंत कॅशबॅक + नो-कॉस्ट ईएमआय वापरून आपण आपल्या खरेदीवर बचत करू शकता - याचे सर्व श्रेय  HDFC Bank फेस्टिव्ह ट्रीट्स ला जाते. आपण आपल्या HDFC Bank Debit & Credit Cards वापरून Amazon, Croma, Tata Cliq व Flipkart वरील लोकप्रिय ऑफर्सचा लाभ घेऊ शकता व इझीईएमआयही करू शकता. गरज भासल्यास तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करु शकता आणि केवळ रू. 2149 / लाख व पुढे इतक्या दराने ईएमआयसह प्रक्रिया शुल्कावर 50% सूट मिळवू शकता.

आपल्या पसंतीचे बरेच पर्याय स्मार्ट होण्याकडे वळत आहेत, ही वेळ आहे या उपकरणांचा वापर करून आपले घर स्मार्टहोम बनवण्याची. ही उपकरणे आपले आयुष्य केवळ सोपे करतात असे नाही. पण, प्रत्येक टेक-सॅव्ही व्यक्तीपाशी ती असलीच पाहिजेत.

This is a partnered post.

First published:

Tags: Amazon