Home /News /money /

कोरोना काळात पैसे काढणं झालं सोपं, ATM व्हॅन येणार दारात; या बँकेची मोठी घोषणा

कोरोना काळात पैसे काढणं झालं सोपं, ATM व्हॅन येणार दारात; या बँकेची मोठी घोषणा

ATM व्हॅन येणार दारात

ATM व्हॅन येणार दारात

कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचारात अनेक भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात आलेत. कंटेनमेंट झोनमध्ये राहणाऱ्या लोकांना गरज पडल्यास पैसे काढण्यासाठीही बाहेर जाता येत नाही.

    नवी दिल्ली, 25 एप्रिल: भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Second Wave of Coronavirus) सुरु आहे. कोरोनाच्या वाढत्या केसेसचा (Coronavirus cases in India) विचार करता अनेक भाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. ज्या भागात कंटेनमेंट झोन आहे, तिथल्या लोकांना कोणत्याच कामासाठी बाहेर फिरता येत नाही. अगदी पैशांची गरज असली तरी त्यांना कुठेच जाता येत नाही. त्यांना मोठ्या गैरसोईला सामोरं जाव लागतं. हे लक्षात घेऊन देशातील प्रमुख खासगी बँक एचडीएफसीने (HDFC) विशेष पुढाकार घेतला आहे. HDFC बँकेने कोविड -19च्या या परिस्थितीत ग्राहकांना अडचणींचा सामना करता यावा यासाठी देशभरात मोबाईल एटीएम (Mobile ATM) सुविधा सुरू केली आहे. देशातील प्रमुख 19 शहरांमधील लोकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे. कोणत्या शहरांमध्ये असेल सुविधा यासंदर्भात बँकेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. एटीएम व्हॅन (ATM Van)ची ही सुविधा काही मोठ्या शहरांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मुंबई, चेन्नई, हैदराबाद, पुणे, लखनऊ, दिल्ली, लुधियाना या शहरांचा समावेश आहे. बँकेची ही सुविधा त्याच ठिकाणी असेल ज्याठिकणी कोव्हिडचा जास्त प्रादुर्भाव असेल आणि जिथे कंटेनमेंट झोन असेल,म्हणजेच लोकांना बाहेर जाण्यास पूर्णपणे मनाई असेल तिथेच ही एटीएम व्हॅन पोहचेल. (हे वाचा: '.... तोपर्यंत कोरोनाची दुसरी लाट थोपवायला हवी,' पंतप्रधानांचं देशाला आवाहन) व्हॅन सॅनिटायझेशन कंटेनमेंट झोन म्हणजेच कोरोनाबाधीत क्षेत्रातील लोक या व्हॅनमध्ये पैसे काढण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे व्हॅनमध्ये येणाऱ्या लोकांचा आणि कर्मचाऱ्यांचा विचार करता. व्हॅन सॅनिटायझेशनकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. तसेच बँक कर्मचार्‍यांसहित लोकांनाही मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागेल. महत्त्वाचे म्हणजे एचडीएफसीने गेल्या वर्षीही या प्रकारची सुविधा दिली होती. कोरोनाच्या काळात आपल्या एटीएममध्ये पैसे असतील याची खात्री बॅंकेने दिली आहे. एका मोबाईल एटीएममधून दिवसातून 100-150 ट्रान्जेक्शन केले जाऊ शकतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: ATM, Bank, Bank services, Hdfc bank

    पुढील बातम्या