Home /News /money /

HDFC बँक दरवर्षी दीड ते दोन हजार नवीन शाखा उघडणार; ग्राहकांना होणार फायदा

HDFC बँक दरवर्षी दीड ते दोन हजार नवीन शाखा उघडणार; ग्राहकांना होणार फायदा

एचडीएफसी बँकेची (HDFC Bank) देशभरात एकूण 18,130 एटीएम आणि कॅश डिपॉझिट मशीन आहेत. याशिवय बँकेच्या शाखांचं जाळं मजबूत करण्यासाठी बँकेने 15,341 बिझनेस कॉरस्पाँडंट तयार केले आहेत.

मुंबई, 22 जून: खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) दरवर्षी दीड ते दोन हजार नवीन शाखा उघडण्याची योजना तयार केली आहे. पुढील तीन ते पाच वर्षांमध्ये भारतात जवळपास 10 हजार नवीन शाखा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) शशीधर जगदीशन यांनी आर्थिक वर्ष 2021-22 च्या आर्थिक अहवाल जारी करताना या संदर्भात माहिती दिली. ‘मनी कंट्रोल’ने दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात देशभरात 1,500 ते 2,000 नवीन शाखा उघडल्या जाणार आहेत. हा क्रम पुढील तीन ते पाच वर्षांपर्यंत सुरू राहणार आहे. शिवाय दर तीन आठवड्यांत एक नवीन फीचर ग्राहकांना उपलब्ध करून दिलं जाणार आहे. या माध्यमातून शाखांचे व्यवहार डिजिटल होतील आणि बँकांच्या सेवांबद्दल ग्राहकांना वेळोवेळी माहिती दिली जाणार आहे, असं जगदीशन यांनी म्हटलं. उघडल्या जाणाऱ्या शाखा लहान असतील आणि त्यामुळे बँकेला प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोण्यासाठी याची चांगलीच मदत होणार आहे. इन्शुरन्सचा प्रीमियम हप्त्यांमध्ये भरता येणार; काय आहे IRDAI ची योजना? संपूर्ण देशभरात पसरलंय बँकेचं जाळं देशात खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेकडे मार्चपर्यंत 21,683 बँकिंग आऊटलेट आहेत. तर 6,342 बँकांच्या शाखा आहेत. यातील चार शाखा या परदेशात आहेत. एचडीएफसी बँकेची देशभरात एकूण 18,130 एटीएम आणि कॅश डिपॉझिट मशीन आहेत. याशिवय बँकेच्या शाखांचं जाळं मजबूत करण्यासाठी बँकेने 15,341 बिझनेस कॉरस्पाँडंट तयार केले आहेत. दरम्यान, नवीन शाखा उघडल्या जाणार असल्याने बँकेतील ठेवी वाढतील आणि हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशनच्या (Housing Development Finance Corporation) विलनीकरणात याची मदत होईल. बँकेतील एकूण ठेवी व कर्जांत वाढ एचडीएफसी बँकेने दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत वार्षिक आधारावर त्यांच्या एकूण ठेवी आणि लोन बुकमध्ये वाढ झाली आहे. आर्थिक वर्षाच्या समाप्तीपर्यंत बँकेत एकूण 15.59 लाख कोटी रुपये आले आहेत. मागील आर्थिक वर्षांच्या तुलनेत ही रक्कम 17 टक्के अधिक आहे. चालू आणि बचत खात्याच्या भागीदारीत 48 टक्के वाढ झाली आहे. बँक लोन बुकही एका वर्षाच्या आधीच्या तुलनेत 21 टक्के वाढून 13.68 लाख कोटींवर पोहोचलं आहे. खिशाला लागणार कात्री? घरगुती गॅसपासून मालमत्तेपर्यंत येत्या 10 दिवसात बदलणार 'हे' 5 नियम नवीन डिजिटल उत्पादने व सेवा करणार लाँच बँकेचे एमडी म्हणाले की, बँकेच्या व्यवहारांत काही तांत्रिक दोष असल्याकारणाने आरबीआयने (RBI) बँकेवर प्रतिबंध लावले होते. परंतु आता या समस्यांवर मात करण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्व प्रकारचे नियामक निर्बंध संपुष्टात आले आहेत. सध्या बँकेने पूर्णपणे डिजिटल सेवांमध्ये वाढ करण्यावर व तांत्रिकदृष्ट्या बँकेच्या ग्राहकांना उत्तम सेवा देण्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे. यामुळे आता डिजिटल 2.0 अभियानाअंतर्गत पावलं पुढे टाकली आहेत. आगामी काही तिमाहींमध्ये बँक आता नवीन डिजिटल उत्पादनं व सेवा लाँच करणार आहे.
First published:

Tags: Bank services, Hdfc bank, Money

पुढील बातम्या