नवी दिल्ली, 1 जून : कोरोना आणि लॉकडाउन पाहता एचडीएफसी बँक (HDFC Bank) आपल्या ग्राहकांना अनेक सुविधा देत आहे. आता HDFC बँकेने 50 शहरांमध्ये मोबाईल एटीएम सुविधा सुरू केली आहे. कोरोनाची दुसरी लाट आणि त्यामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांदरम्यान, बँकेच्या या सुविधेमुळे अनेकांना दिलासा मिळू शकतो. एका मोबाईल एटीएमवरुन (Mobile ATM) ग्राहक 15 हून अधिक ट्रान्झेक्शन्स करू शकतात.
देशभरातील अनेक राज्यात लॉकडाउन निर्बंध लागू केले असताना, एचडीएफसी बँकेने मंगळवारी 50 शहरांत मोबाईल एटीएम सुरू करण्याची घोषणा केली. यामुळे निर्बंध असणाऱ्या ठिकाणी लोकांना अधिक दूर, लांब न जाता कॅश काढण्याची सुविधा उपलब्ध होईल.
Mobile ATM आता चेन्नई, मुंबई, दिल्ली, गुरुग्राम, विजयवाडा, देहरादून, कटक, लुधियाना, लखनऊ, भुवनेश्वर, चंडीगढ, तिरुवनंतपुरम, प्रयागराज, पुणे, हैदराबाद, अहमदाबाद, कोयंम्बतूर, नोएडा, बेंगळुरू, मैसूर, जयपूर, अंबाला, नाशिक, पटना, जम्मू, पानिपत, रेवाडी येथे सुरू आहे.
तसंच जूनच्या पहिल्या आठवड्यापासून मोबाईल एटीएम पद्दुचेरी, कानपूर, आगरा, ठाणे, दिल्ली, नागपूर, वाराणसी, कोलकाता, गोरखपूर येथेही सुरू होणार आहे. या मोबाईल एटीएम सेवेद्वारे लोक 15 हून अधिक ट्रान्झेक्शन्स करू शकतात. मोबाईल एटीएम सर्व लोकेशनवर एका खास वेळी उपलब्ध असतील आणि एका दिवसांत 3 ते 4 ठिकाणी आपली सेवा देतील.
In these uncertain times, we are doing our bit to help #SimplifyLife for you. We have deployed HDFC Bank #MobileATM across 50 locations in India. HDFC Bank works with local authorities to identify & reach areas that have limited banking facilities. Visit: https://t.co/VsP8xEj8JD pic.twitter.com/mxfJumU7eV
— HDFC Bank (@HDFC_Bank) May 21, 2021
या मोबाईल एटीएममधून कॅश काढण्याशिवाय, तुमचा बँक बॅलेन्स चेक करता येईल. तसंच एटीएम पिन नंबर चेंजही करता येईल. क्रेडिट कार्ड पेमेंट, मोबाईल रिचार्ज सारख्या 16 सुविधांचा याद्वारे फायदा घेता येईल. कोरोना काळात ही सुविधा देताना योग्य ती काळजी घेत, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशनकडेही विशेष लक्ष देण्यात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.