मुंबई, 4 जानेवारी : देशातली सगळ्यात मोठी फायनान्स कंपनी HDFC Limited ने ग्राहकांना नव्या वर्षाची भेट दिली आहे. HDFC ने व्याजदर घटवले आहेत. यामुळे होमलोन, ऑटो लोन आणि पर्सनल लोनचे EMI कमी होतील. नव्या ग्राहकांना कर्ज घेणं स्वस्त होणार आहे. त्याआधीच SBI आणि ICICI या बँकांनी व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली होती. HDFC लिमिटेड ने 0.05 टक्क्यांनी घटवण्याचा निर्णय घेतलाय. हे नवे दर 6 जानेवारीपासून लागू होतील.
HDFC चे नवे दर
6 जनवरी 2020 पासून एखाद्या महिला ग्राहकाने 30 लाख रुपयांचं होमलोन घेतलं तर तिला 8.05 टक्के व्याजदर असेल. महिलांसाठी 30 ते 75 लाख रुपयांपेक्षा जास्त होमलोन घ्यायचं असेल तर 8.3 टक्के व्याजदर असेल. त्याशिवाय 75 लाख रुपये होमलोनचे दर 8.4 टक्के असतील. महिलांपेक्षा पुरुषांसाठी 0.5 टक्के व्याजदर अधिक आहे.
(हेही वाचा : i phone ची विक्री घटली, थेट सीईओ टिम कुकचा पगार कापला)
SBI ची व्याजदरात कपात
स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI नेही व्याजदरात 0. 25 टक्क्यांची कपात केली आहे. ही कपात 1 जानेवारीपासून लागू झालीय. यामुळे होम लोन आणि ऑटो लोम स्वस्त होईल.
या आर्थिक वर्षात बँकेने बँकेने आठव्यांदा MCLR मध्ये कपात केली आहे. या बँकेची होमलोन आणि ऑटो लोनमध्ये सुमारे 25 टक्के भागिदारी आहे. बहुतांश बँकांमध्ये होमलोनचे व्याजदर 8 ते 9 टक्के आहे.
(हेही वाचा : तुमच्याकडे असलेल्या सोन्यावर कर भरावा लागतो का? जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरं)
==================================================================================
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.