Home /News /money /

EMI फेडण्यासाठी आता या बँकेच्या ग्राहकांना शाखेत जाण्याची गरज नाही, वाचा काय मिळणार सुविधा

EMI फेडण्यासाठी आता या बँकेच्या ग्राहकांना शाखेत जाण्याची गरज नाही, वाचा काय मिळणार सुविधा

देशातील खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणारी एचडीएफसी बँक (HDFC Bank) ग्राहकांसाठी वेळोवेळी विविध सुविधा घेऊन येते, आता देखील बँकेने एक नवी सेवा सुरू केली आहे ज्यामुळे ग्राहकांचे कर्ज फेडण्याचे काम सोपे होणार आहे.

    नवी दिल्ली, 29 जानेवारी: देशातील खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या एचडीएफसी बँकेने (HDFC Bank) ग्राहकांसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ही सेवा सुरू केली आहे. यामुळे बँकेच्या कर्जदारांना कर्जाचे हप्ते (Depositing EMI) भरण्यासाठी बँक शाखेमध्ये जाण्याची गरज नाही पडणार. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर ग्राहकांना आता जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन EMI भरता येणार आहे. एचडीएफसी बँक आणि सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडने देशामध्ये त्यांच्या बिझनेस करस्पाँडंट्ससाठी ईएमआय कलेक्शन सर्व्हिसेस (EMI Collection Services) लाँच केले आहे. VLE कडे कर्जदारांना द्यावी लागेल ही माहिती कॉमन सर्व्हिस सेंटरवर तुमचा कर्जाचा हप्ता जमा करण्यासाठी तुम्हाला व्हिलेज लेव्हल एंटरप्रेन्योर (VLE) ला  त्यांची काही माहिती द्यावी लागेल, ज्याचे व्हेरिफिकेशन करता येईल. यामध्ये ग्राहकांचा कर्ज क्रमांक, रजिस्टर्ड मोबाइल क्रमांक, पॅन, जन्मतारीख इ. माहिती VLE कडे कर्जदारांना द्यावी लागेल. यानंतर ग्राहकांच्या नोंदणीकृत फोन नंबरशी व्हीएलई कर्ज खाते लिंक करून  सिस्टमवर देय रक्कम तपासता येईल. यानंतर, बँक व्हीएलईकडून जमा केलेल्या रकमेची पावती ग्राहकांना दिली जाईल. त्यानंतर तो ही रक्कम बँकेत जमा करेल. (हे वाचा-Budget 2021: आज सादर केला जाईल इकॉनॉमिक सर्व्हे,वाचा अर्थसंकल्पाशी काय आहे संबंध) आर्थिक सेवा ग्रामीण आणि दुर्गम भागात दिली जाईल सीएससीच्या माध्यमातून कलेक्शन फॅसिलिटी सुरू झाल्यानंतर ग्राहकांना बँक शाखेमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागात आर्थिक सेवांचा विकास होईल. एचडीएफसी बँकेच्या मते, या अभियानाअंतर्गत सीएससी आणि एचडीएफसी बँक कर्जाचा नियमित ईएमआय गोळा करण्यासाठी बिझनेस करस्पाँडंट्सकडून देण्यात येणाऱ्या सेवांचा वापर करतील. (हे वाचा-मुंबईमध्ये पेट्रोलचे भाव जवळपास 93 रुपये, तर याठिकाणी 101 रुपये आहे किंमत) एचडीएफसी बँक आणि सीएससीच्या या करारामुळे दुर्गम भागातील लाखो लोकांना फायदा होणार आहे. जवळपास 1 लाख व्हीएलईच्या माध्यमातून बँकिंग आणि इतर आर्थिक सेवांचा लाभ या भागातील नागरिकांना घेता येणार आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Hdfc bank, Money

    पुढील बातम्या